ऐश्वर्या- अभिषेकने लेक आराध्यासोबत देसी गर्ल गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 18:15 IST2021-02-23T18:02:23+5:302021-02-23T18:15:34+5:30
Aishwarya rai and aaradhya dance to abhishek bachchan song : आराध्या बच्चनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात.

ऐश्वर्या- अभिषेकने लेक आराध्यासोबत देसी गर्ल गाण्यावर केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल
बॉलिवूडमध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे कुटुंब कायम चर्चेत असते. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आराध्याचा असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर समोर आला आहे. या व्हिडीओत आराध्या डान्स करताना दिसतेय.
या व्हिडिओमध्ये आराध्या वडील अभिषेक बच्चन आणि आई ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत ‘दोस्ताना’ सिनेमातील ‘देसी गर्ल’ या गाण्यावर डान्स करताना दिसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ ऐश्वर्याची मावशीची मुलगी श्लोका शेट्टीच्या लग्नातील आहे. या लग्नातील काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये बच्चन फॅमिली खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत ऐश्वर्या लाल रंगाच्या एथनिक आऊटफिटमध्ये दिसतेय तर आराध्याने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
जानेवारीपासून अभिषेक हैदराबादमध्ये आपल्या कुटूंबासमवेत 'पोन्नीयन सेल्वान' या तमिळ सिनेमाचे शूटिंग करत होता. एका महिन्याहून अधिक काळानंतर अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत परतले आहेत. ऐश्वर्याने विमानतळावर आराध्याचा हात धरल्याचे फोटो समोर आले होते.ऐश्वर्या अनेकदा आराध्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. आपल्या मुलीवर प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी ती सोडत नाही.