7 महिन्याच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या राय बच्चन दिसणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 15:45 IST2017-06-06T10:15:25+5:302017-06-06T15:45:25+5:30

सात महिन्याच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर आपली जलवा दाखवायला सज्ज झाली आहे. ऐश्वर्याने राकेश ओमप्रकाश ...

Aishwarya Rai Bachchan will appear in the film after 7 months break | 7 महिन्याच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या राय बच्चन दिसणार या चित्रपटात

7 महिन्याच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या राय बच्चन दिसणार या चित्रपटात

त महिन्याच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर आपली जलवा दाखवायला सज्ज झाली आहे. ऐश्वर्याने राकेश ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट साईन केला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा आणि ऐश्वर्या राय  फॅनी  खान या चित्रपटाव्दारे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. अभिषेक बच्चन यांने राकेश मेहरा यांच्यासोबत दिल्ली 6 या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाबाबत अजून जास्त काही माहिती मिळाली नाही आहे. फॅनीची निर्मिती क्रीआर्ज एंटरटेनमेंट करणार आहे. क्रिआर्ज  एंटरटेनमेंटकडून चित्रपटात ऐश्वर्या राय असल्याची न्यूज कंन्फर्म केली आहे. ऐश्वर्याने काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या ऐ-दिल-है मुश्किलमध्ये दिसली होती. ऐश्वर्या रायचे म्हणणे आहे की, ऐ दिल है मुश्किल चित्रपटानंतर ब्रेक घेऊन ती खूश आहे. यानंतर तिने आपल्या खासगी आयुष्याला वेळ दिला. या वर्षांच्या अखेरीस या चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बल 17 वर्षांनतंर अनिल कपूर आणि ऐश्वर्या एकत्र काम करणार आहेत. ऐश्वर्याला या चित्रपटाची कथा आवडला आहे.  

राकेश मेहरा यांच्या मागच्या वर्षी मिर्जिया हा चित्रपट आला होता ज्याच्या माध्यमातून अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सैय्यामी खेर यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल करु शकला नाही. त्या आधी आलेला राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा भाग मिल्खा भाग चित्रपट रसिकांच्या चांगला पसंतीस उतरला होता. त्यामुळे फॅनी खान हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो आहे हे बघण्यासाठी बरीच प्रतिक्षा करावी लागणार आहे.  

Web Title: Aishwarya Rai Bachchan will appear in the film after 7 months break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.