ऐश्वर्या रायने लेक आराध्यासह घेतलं जीएसबीचं दर्शन, नेटकरी कमेंट्स करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 08:24 IST2025-09-01T08:23:50+5:302025-09-01T08:24:17+5:30

काल रात्री उशिरा ऐश्वर्या आणि लेक आराध्या जीएसबी पंडालमध्ये पोहोचले होते.

Aishwarya Rai bachchan visited gsb pandal with aaradhya took blessing from lord ganesha | ऐश्वर्या रायने लेक आराध्यासह घेतलं जीएसबीचं दर्शन, नेटकरी कमेंट्स करत म्हणाले...

ऐश्वर्या रायने लेक आराध्यासह घेतलं जीएसबीचं दर्शन, नेटकरी कमेंट्स करत म्हणाले...

गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे धामधूम असते. सगळ्याच शहरातील अनेक गणपती मंडळ प्रसिद्ध आहेत. मुंबईतील लालबागचा राजा असो, गणेशगल्लीचा राजा असो किंव मग जीएसबी गणपती पंडाल. अभिनेत्री ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) जीएसबी गणपतीचं दर्शन घेतलं. ऐश्वर्या दरवर्षी न चुकता जीएसबीच्या दर्शनाला येते. तिच्यासोबत तिची आई आणि लेक असते. काल रात्री उशिरा ऐश्वर्या आणि लेक आराध्या (Aaradhya) जीएसबी पंडालमध्ये पोहोचले होते. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

ऐश्वर्या राय गणपती बाप्पाची भक्त आहे. म्हणूनच दरवर्षी ती बाप्पााच्या दर्शनासाठी पोहोचतेच. ही जणू एक प्रथाच झाली आहे. काल जीएसबीच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या ऐश्वर्या रायने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ऑफ व्हाईट रंगाच्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. तर लेक आराध्याने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी ऐश्वर्याची आई मात्र दिसली नाही. ऐश्वर्याने हात जोडत बाप्पाचा आशीर्वाद घेतला. नंतर चाहत्यांची तिची झलक पाहण्यासाठी गर्दी झाली. तिने हसतच सर्वांसोबत फोटोही काढला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.


या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत ऐश्वर्या आणि आराध्याच्या हेअरस्टाईलवर ट्रोलिंग केलं आहे. 'कृपया मायलेकींनी आपली हेअरस्टाईल बदला','आराध्याला काय झालं, अशी का दिसतेय?','आराध्या ऐश्वर्याचीच आई दिसतेय' अशा कमेंट्स आल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाची चर्चा होती. अंबानींच्या सोहळ्यात ऐश्वर्या बच्चन कुटुंबापासून वेगळी राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी अभिषेक ऐश्वर्या आणि आराध्या एकत्रच व्हेकेशनला गेले आणि या चर्चांना पूर्णविराम लावला. 

Web Title: Aishwarya Rai bachchan visited gsb pandal with aaradhya took blessing from lord ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.