वडिलांच्या आठवणीत ऐश्वर्या राय बच्चन झाली भावुक, गोड फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 09:54 IST2025-11-21T09:50:23+5:302025-11-21T09:54:58+5:30
ऐश्वर्याने आज तिच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.

वडिलांच्या आठवणीत ऐश्वर्या राय बच्चन झाली भावुक, गोड फोटो शेअर करत म्हणाली...
Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते. तितकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. ऐश्वर्या राय बच्चनचा मोठा चाहतावर्ग आहे. विश्वसुंदरी असली तरी ऐश्वर्यासाठी तिचं कुटुंब हे सर्वात महत्वाचं आहे. ऐश्वर्या तिच्या पालकांच्या खूप जवळ आहे. आता ऐश्वर्याने तिचे दिवंगत वडील कृष्णराज राय यांच्या जंयतीनिमित्त एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.
वडिलांच्या जंयतीनिमित्त ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहलेल्या या पोस्टमधून तिचे आणि तिच्या वडिलांचे नाते किती घट्ट होते, ही गोष्ट समजून येते. ऐश्वर्याने काही गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती स्वतः, तिचे वडील कृष्णराज राय आणि मुलगी आराध्या दिसत आहे. एका फोटोमध्ये, ऐश्वर्या राय तिच्या वडिलांच्या फोटोसमोर डोळे मिटून प्रार्थना करताना दिसत आहे. ऐश्वर्यानं फोटोसोबत लिहलं, "वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय बाबा - अज्जा (आजोबा), आमचे देवदूत, तुमच्यावर आमचं कायम प्रेम आहे. आराध्याच्या १४ व्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या अपार प्रेम आणि आशीर्वादांबद्दल धन्यवाद". या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.
ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय यांचे २०१७ मध्ये निधन झाले होते आणि तेव्हापासून ती दरवर्षी त्यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करते. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त ती कुटुंबासोबत वेळ घालवते आणि गरिबांना मदत करते. वडिलांच्या जयंतीपूर्वी ऐश्वर्या राय नुकतीच आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे आध्यात्मिक गुरू श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभात सहभागी झाली होती. तिथे तिने धर्म, जात आणि प्रेम यांसारख्या विषयांवर केलेल्या प्रभावी भाषणानेही सर्वांची मने जिंकली.