इंटिमेट सीन्स द्यायला ऐश्वर्या राय बच्चनने दिला नकार..वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:08 IST2017-09-22T05:34:58+5:302017-09-22T11:08:37+5:30
लाखो दिलांची धडकन ऐश्वर्या राय बच्चन लवकरच फन्ने खान चित्रपटातून कमबॅक करते आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार ...

इंटिमेट सीन्स द्यायला ऐश्वर्या राय बच्चनने दिला नकार..वाचा सविस्तर
ल खो दिलांची धडकन ऐश्वर्या राय बच्चन लवकरच फन्ने खान चित्रपटातून कमबॅक करते आहे. यात तिच्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव दिसणार आहेत. ऐ दिल है मुश्किलनंतर झालेल्या कोन्ट्रोव्हर्सीनंतर ऐश्वर्या खूप अर्लट झाली आहे असे म्हणायला हवे. ऐ दिल है मुश्किलमध्ये रणबीर कपूरसोबत दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे ती खूपच चर्चेत आली होती. त्यामुळे ऐ दिल है मुश्किल चित्रपटातील चुका तिला पुन्हा नाही करायच्या आहेत. फन्ने खान चित्रपटात कोणत्याही प्रकारचा बोल्ड किंवा इंटिमेट सीन्स देणार नाही असे तिने सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऐश्वर्याने राजकुमार रावसोबत इंटिमेच सीन्स देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. अनिल कपूरने या चित्रपटाची शूटिंग याआधीच सुरु केली आहे. तर राजकुमार राव चित्रपट न्यूटन रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वी राजकुमार मीडियाशी बोलताना म्हणाला मी लवकरच ऐश्वर्या आणि अनिल कपूरला भेटणार आहे. याचित्रपटाचे रीडिंग सेशनससुद्धा करणार आहेत.
ALSO RAED : FIRST LOOK : सलग पाच दिवस, पन्नास तास! ‘फन्ने खान’साठी अनिल कपूरने घेतली अशी मेहनत!!
फन्ने खानमध्ये ऐश्वर्या आपल्या पेक्षा 10 वर्षांने लहान असलेल्या राजकुमार रावच्या अपोझिट दिसणार आहे. राजकुमार राव आणि ऐश्वर्याची ओळख मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल दरम्यान झाली होती. आधी या चित्रपटात राजकुमार रावच्या जागी आर. माधवन दिसणार असल्याची चर्चा होती मात्र ऐनवेळी यात राजकुमार रावचे नाव फायनल झाल्याचेसमोर आले. त्यानंतर काही दिवसांच्या शूटिंगसाठी आर. माधवनने मोठी रक्कम मागितली असल्याचे कळले. यानंतर माधवनच्या जागी चित्रपट राजकुमारला घेण्यात आले. अतुल मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. गेल्या वर्षी आलेल्या करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले होते मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला आणि ऐश्वर्या आणि रणबीरच्या इंटिमेट सीन्सची जास्त चर्चा झाली. त्यानंतर भूमिका आणि चित्रपट निवडताना ऐश्वर्या पूर्वीपेक्षा जास्त चोखंदळ झाली आहे.