ऐश्वर्या राय बच्चनला घ्यायचीय सोशल मीडियावर एन्ट्री; पण ‘ही’ आहे अडचण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 13:22 IST2017-02-23T07:52:22+5:302017-02-23T13:22:22+5:30

‘ऐ दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्या राय बच्चन हिचे हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस रूप तिच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज होते. या ...

Aishwarya Rai Bachchan gets entry on social media; But 'this' is the difficulty! | ऐश्वर्या राय बच्चनला घ्यायचीय सोशल मीडियावर एन्ट्री; पण ‘ही’ आहे अडचण!

ऐश्वर्या राय बच्चनला घ्यायचीय सोशल मीडियावर एन्ट्री; पण ‘ही’ आहे अडचण!

दिल है मुश्किल’मधील ऐश्वर्या राय बच्चन हिचे हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस रूप तिच्या चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज होते. या चित्रपटामुळे ऐश्वर्या चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या फॅन फॉलोर्इंगमध्येही मोठी भर पडली होती. खरे तर ऐश्वर्याचे फॅन फॉलोर्इंग केवळ भारतापुरते मर्यादीत नाही. जगभर तिचे चाहते आहेत. पण कदाचित ऐश्वर्याला आपल्या या चाहत्यांसोबत आॅल टाईम कनेक्ट राहायचे आहे. आता जगभरातील चाहत्यांसोबत कनेक्ट राहायचे म्हटल्यावर सोशल मीडियाशिवाय दुसरा कुठला पर्याय असणार? ऐश्वर्याचा हबी अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. तिचे सासरे मेगास्टार अमिताभ बच्चन तर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. आता आपणही सोशल मीडियावर एन्ट्री घ्यावी, असे ऐश्वर्याला वाटू लागले आहे. 



आता ऐश्वर्याला सोशल मीडियावर यायला कुणी रोखलेय? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण आहे, एक अडचण आहे. ही अडचण म्हणजे, अभिषेकची ‘ना’. ऐश्वर्याने सोशल मीडियावर यावे, या गोष्टीला अभिषेकचा विरोध असल्याचे कळतेय. अर्थात यामागे एक खास कारण आहे. ऐश्वर्या टिष्ट्वटर वा अन्य सोशल साईटवर ट्रोल व्हावी वा तिच्याविरूद्ध कुणी वाईट कमेंट्स करावेत, असे अभिषेकला मुळीच वाटत नाही. याच एका कारणामुळे तो ऐश्वर्याला याकामी विरोध करतोय. आता या मुद्यावर अभिषेक ऐश्वर्याचे मन वळवण्यात यशस्वी होतो की ऐश्वर्या अभिषेकच्या विरोधात जावून सोशल मीडियावर एन्ट्री घेते, ते येत्या काळात बघूच. तोपर्यंत प्रतीक्षा!

ऐश्वर्या सोशल मीडियावर आत्तापर्यंत तरी अ‍ॅक्टिव्ह नाही. पण या यादीत ती एकटी नाही. तिच्यासारखे अनेक स्टार सोशल मीडियावर नाहीत. यात रणबीर कपूर, कंगणा राणौत, इमरान खान,संजय लीला भन्साळी, आदित्य चोप्रा आदींचा समावेश आहे.
 
 

Web Title: Aishwarya Rai Bachchan gets entry on social media; But 'this' is the difficulty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.