IIFA मध्ये तिरंगा फडकविणारी ऐश्वर्या राय-बच्चन ठरणार पहिली भारतीय महिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2017 16:40 IST2017-07-23T10:17:44+5:302017-07-23T16:40:53+5:30

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला मेलबर्न येथे होणाºया भारतीय फिल्म महोत्सवात (आयएफएफएम) जागतिक सिनेमात योगदान दिल्याबद्दल सन्मानित केले जाणार ...

Aishwarya Rai Bachchan to be the first Indian woman to shoot tri-color in IIFA | IIFA मध्ये तिरंगा फडकविणारी ऐश्वर्या राय-बच्चन ठरणार पहिली भारतीय महिला!

IIFA मध्ये तिरंगा फडकविणारी ऐश्वर्या राय-बच्चन ठरणार पहिली भारतीय महिला!

लिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला मेलबर्न येथे होणाºया भारतीय फिल्म महोत्सवात (आयएफएफएम) जागतिक सिनेमात योगदान दिल्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे. आॅस्ट्रेलियात होणारा हा सोहळा या वर्षातील सर्वात मोठा महोत्सव असेल. आयएफएममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा जल्लोष करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया अ‍ॅट ७०’दरम्यान ऐश्वर्या मेलबर्न येथील फेडरेशन चौकात तिरंगा फडकविणार आहे. त्याचबरोबर अशाप्रकारचा सन्मान मिळालेली ऐश्वर्या पहिली भारतीय महिला ठरणार आहे. 

पुढे ११ आॅगस्टच्या रात्री वेस्टपॅक आयएफएफएम पुरस्कार सोहळ्यात ऐश्वर्याला व्हिक्टोरिया सरकारच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. याविषयी सोहळ्याच्या आयोजकांनी सांगितले की, आमच्यासाठी यावर्षी अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन हिला सन्मानित करणे गौरवास्पद आहे. ती एक आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणारी महिला आहे. आॅस्ट्रेलियाई प्रेक्षकांमध्ये ती खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे ऐश्वर्याचा सन्मान आमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, जेव्हा ऐश्वर्या मेलबर्न येथे तिरंगा फडकविणार तेव्हा अशी संधी मिळालेली ती पहिली महिला ठरणार आहे. ऐश्वर्याला मिळालेला हा बहुमान सगळ्यांसाठीच सन्मानाची बाब आहे. आयोजक भौमिकने म्हटले की, जागतिक चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याचे योगदान मोठे आहे. हा विचार मनात ठेवून व्हिक्टोरिया सरकारने तिला सन्मानित करण्याचे ठरविले आहे. याच क्षणाची आम्ही सगळेजण आतुरतेने वाट पहात असल्याचे त्यांनी म्हटले. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan to be the first Indian woman to shoot tri-color in IIFA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.