‘देवदास’सह कान्स सोहळ्याला जाणार ऐश्वर्या राय बच्चन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 11:09 IST2017-05-14T05:39:10+5:302017-05-14T11:09:10+5:30
येत्या १७ मे पासून पॅरिसमध्ये रंगणा-या कान्स चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने सगळ्यांना मोहित करणार ...
.jpg)
‘देवदास’सह कान्स सोहळ्याला जाणार ऐश्वर्या राय बच्चन!
य त्या १७ मे पासून पॅरिसमध्ये रंगणा-या कान्स चित्रपट महोत्सवात ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याने सगळ्यांना मोहित करणार आहे. या महोत्सवात ऐश्वर्या संजय लीला भन्साळींचा ‘देवदास’ हा सिनेमा पुन्हा एकदा सादर करणार आहे. २००२ मध्ये ऐश्वर्या पहिल्यांना या चित्रपटासोबत कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचली होती. ऐश्वर्या एका इंटरनॅशनल ब्रँडची जुळलेली आहे. या ब्रँडची ती ब्रँड अॅम्बेसेडर आहे. याच नात्याने या ब्रँडच्या वतीने ऐश्वर्या यंदाही कान्स सोहळ्यात आपली उपस्थिती नोंदवणार आहे. या सोहळ्यात २० मे रोजी ऐश्वर्या ओपन एअर सिनेमाच्या रूपात ‘देवदास’ सादर करेल.
![]()
ALSO READ : कान्सच्या रेड कार्पेटवर नसणार दीपिका पादुकोण!
यापूर्वीच्या कान्समधील उपस्थितीबद्द्ल ऐश्वर्या उत्सूक होती. अगदी तितकीच उत्सूक ती यावेळीही आहे. मी केवळ एक कलाकार म्हणून कान्समध्ये जात नाही तर भारतीय सिनेमाची गौरवन्वित प्रतिनिधी या नात्याने मी कान्समध्ये उपस्थिती नोंदवत आलीय. पहिल्यांदा ‘देवदास’ आम्ही सादर केला, तेव्हा आमचे अभूतपूर्व स्वागत झाले होते. तो क्षण आजही माझ्या स्मरणात आहे, असे ती म्हणाली.
भरतचंद्र चटोपाध्याय यांच्या १९०१ मध्ये आलेल्या नॉवेलवर आधारित ‘देवदास’ या चित्रपटात शाहरूख खान देवदासच्या भूमिकेत दिसला होता. तर ऐश्वर्या पारो आणि माधुरी दीक्षित चंद्रमुखीच्या भूमिकेत होती. गतवर्षीप्रमाणे यंदा या सोहळ्यात ऐश्वर्यासोबत सोनम कपूर सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणार आहे. गतवर्षी ऐश्वर्या राय बच्चन पर्पल लिपस्टिक लावून कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली होती. यामुळे तिला बºयाच टिकेला सामोरे जावे लागले होते. याऊलट सोनम कपूरने तिच्या आगळ्या-वेगळ्या फॅशन स्टाईलने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.