'११ वर्षांपासून लेकीची एकच हेअरस्टाईल..' आराध्या झाली ट्रोल, तर ऐश्वर्यालाही नेटकऱ्यांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 11:22 AM2023-07-23T11:22:39+5:302023-07-23T11:23:32+5:30

आराध्या आणि ऐश्वर्याची एकच हेअरस्टाईल दिसत असल्याने नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

aishwarya rai bachchan and daughter aradhya bachchan trolled for their permanent hairstyle | '११ वर्षांपासून लेकीची एकच हेअरस्टाईल..' आराध्या झाली ट्रोल, तर ऐश्वर्यालाही नेटकऱ्यांनी सुनावलं

'११ वर्षांपासून लेकीची एकच हेअरस्टाईल..' आराध्या झाली ट्रोल, तर ऐश्वर्यालाही नेटकऱ्यांनी सुनावलं

googlenewsNext

बच्चन परिवार नेहमीच त्यांच्या साधेपणासाठी ओळखला जातो. अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चनही कुटुंबाच्या पाऊलावर पाऊल ठेवत अगदी साधीच दिसते. नुकतीच आराध्या (Aradhya Bachchan) ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनसोबत एअरपोर्टवर दिसली. त्यांना पाहताच पापाराझींनी गर्दी केली. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्याच्या लुकवर मात्र नेटकरी नाराज झाले. गेल्या कित्येक वर्षांपासून आराध्या आणि ऐश्वर्याची एकच हेअरस्टाईल दिसत असल्याने नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

आपल्या ट्रिपवरुन परत येत असताना अभिषेक बच्चन आणि कुटुंबाला विमानतळावर पाहिले गेले. यावेळी पापाराझींनी त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी ऐश्वर्या ब्लॅक जॅकेट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसली. तर आराध्या ब्लू हुडी मध्ये दिसली. आराध्याने पापाराझींना 'नमस्ते' केले. तिच्या साधेपणाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं. पण दुसरीकडे तिची हेअरस्टाईल पाहून मात्र नेटकरी भडकलेच. 

खरं तर आराध्याला लहानपणापासूनच जितक्या वेळा पाहिलं गेलंय ती नेहमी एका हेअरस्टाईलमध्ये दिसली आहे. आता ती 11 वर्षांची आहे पण गेल्या ११ वर्षांपासून तिची एकच हेअरस्टाईल दिसते. तर तिची आई ऐश्वर्याही सध्या एकाच हेअरस्टाईलमध्ये दिसून येते. आपल्या मुलीची तरी हेअरस्टाईल बदल असं म्हणत ऐश्वर्याला खूप ट्रोल करण्यात येतंय. '११ वर्ष झाली मी आजपर्यंत आराध्याचं कपाळ नाही पाहिलं','या दोघींच्या हेअरस्टाईलशिवाय जगात काही पर्मनंट नाही' असे मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.

Web Title: aishwarya rai bachchan and daughter aradhya bachchan trolled for their permanent hairstyle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.