ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या फन्ने खानची शूटिंग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 11:48 IST2017-09-04T06:16:20+5:302017-09-04T11:48:50+5:30

एका मोठ्या ब्रेकनंतर ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कुमार एकत्र दिसणार आहे.फन्ने खानच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. यात ...

Aishwarya Rai Bachchan and Anil Kapoor's Faney Khan shooting starts | ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या फन्ने खानची शूटिंग सुरू

ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या फन्ने खानची शूटिंग सुरू

ा मोठ्या ब्रेकनंतर ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनिल कुमार एकत्र दिसणार आहे.फन्ने खानच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. यात अभिनेता राजकुमार राव ऐश्वर्यासोबत रामांस करताना दिसणार आहे. या चित्रपटात ऑस्कर नॉमिनेटेडे डच चित्रपट एव्रीबडीस फेमस चा रिमेक आहे.अनिल कपूरने ट्विटरवरुन चित्रपटाची शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे. फोटोसोबत अनिल कपूरने एक फोटो कॅप्शन लिहिले आहे, ''फन्ने खान चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. हा क्षण माझ्यासाठी खास आहे.''    

ऐश्वर्या आणि अनिलची जोडी दोन दशकानंतर एकत्र दिसणार आहे. याआधी दोघे 2000 मध्ये हमारा दिल आपके पास है आणि 1999 साली आलेल्या हिट चित्रपट तालमध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात प्रेक्षकांना दोघांची जोडी आवडली होती. आधी या चित्रपटात ऐश्वर्यासोबत आर. माधवन दिसणार असल्याची चर्चा होती मात्र राजकुमार रावची निवड याचित्रपटासाठी करण्यात आली. अतुल मांजरेकर याचित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. ऐश्वर्या यात तब्बल 10 वर्ष लहान असलेल्या हिरोसोबत रोमांस करताना दिसणार आहे. 'ये दिल है मुश्किल'मध्ये ही ऐश्वर्याने आपल्यापेक्षा लहान असलेल्या हिरोसोबत हॉट सीन्स दिले होते. रणबीर कपूरसोबत ऐश्वर्याने रोमांस केला होता. यानंतर अनेक चर्चा झाल्या होत्या. आराध्याच्या जन्मानंतर ऐश्वार्याने काही काळ इंटस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. तिचे फॅन्स पडद्यावर तिच्या परतण्याची वाट पाहात होते. त्यामुळे ऐश्वर्याच्या फॅन्ससाठी नक्कीच खूषखबर आहे. राजकुमार रावला चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराने या चित्रपटात त्याची निवड झाल्याचे फोनवरुन सांगितले होते. 

Web Title: Aishwarya Rai Bachchan and Anil Kapoor's Faney Khan shooting starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.