ऐश्वर्या राय व करण जोहर यांच्या मैत्रीत फूट ; अनुष्का ठरली ‘निमित्त’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 10:57 IST2017-03-24T05:27:59+5:302017-03-24T10:57:59+5:30
दिग्दर्शक करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सध्या काहीही ठिक नाहीय. सध्या बॉलिवूडमध्ये याचीच चर्चा आहे. अलीकडे ऐश्वर्याच्या ...

ऐश्वर्या राय व करण जोहर यांच्या मैत्रीत फूट ; अनुष्का ठरली ‘निमित्त’!
द ग्दर्शक करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सध्या काहीही ठिक नाहीय. सध्या बॉलिवूडमध्ये याचीच चर्चा आहे. अलीकडे ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी सगळे जवळचे मित्र ऐश्वर्याचे सांत्वन करायला पोहोचले. पण यात एक चेहरा मिसींग होता. हा चेहरा म्हणजे, करण जोहर. होय, ऐश्वर्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला वा श्रद्धांजली सभेला कुठेच करण हजर नव्हता. याचे कारण होते, करण जोहरची एक लहानशी चूक़ ही चूक ऐश्वर्याने चांगलीच मनाला लावून घेतली असल्याचे कळतेय. दोघांमध्ये यावरूनच सध्या मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.
![]()
ALSO READ : करण जोहरला ‘या’ एका गोष्टीसाठी करायचेय, शाहरूख खानशी लग्न!!
प्रकरण आहे,‘ऐ दिल है मुश्किल’च्या वेळचे. करणच्या या चित्रपटात ऐश्वर्याची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या चित्रपटाकडून ऐश्वर्याला बºयाच अपेक्षा होत्या. कदाचित त्याचमुळे े रणबीर कपूरसोबत एकदम हॉट फोटोशूट करायलाही तिने मागेपुढे पाहिले नाही. पण जेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनची गोष्ट आली, तेव्हाच सगळे बिनसले. प्रमोशनच्या ऐनवेळी अनुष्का शर्मा आपल्या ‘फिल्लोरी’ या चित्रपटात बिझी झाली होती. इतकी की, प्रमोशनसाठी वेळ काढणे तिला अशक्य झाले होते. पण अनुष्काशिवाय प्रमोशन करायला करण तयार नव्हता. ऐश्वर्याने काही इव्हेंटमध्ये अनुष्काशिवाय प्रमोशन करण्याची तयारी दाखवली. पण करणने त्यास नकार दिला. त्याने अनुष्काशिवाय प्रमोशन करण्यास ऐश्वर्याला मनाई केली. लोकांना या चित्रपटात ऐश्वर्या लीड रोलमध्ये आहे, असे वाटू नये, असे करणचे मत होते. नेमकी हीच बाब ऐश्वर्याला खटकली. तेव्हापासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. याऊपरही ‘ऐ दिल है मुश्किल’नंतर करण ऐश्वर्याकडे एका चित्रपटाची आॅफर घेऊन गेला. पण ऐश्वर्याने त्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून दोघांमध्ये अबोला असल्याचे कळतेय.