'अभिमान'चा रिमेक करण्यास ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चनने दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 16:53 IST2017-08-02T11:00:48+5:302017-08-02T16:53:44+5:30

ज्या बॉलिवूड कपलला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुरत आहेत ती जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनची. ...

Aishwarya Rai - Abhishek Bachchan refused to remake 'Abhimaan' | 'अभिमान'चा रिमेक करण्यास ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चनने दिला नकार

'अभिमान'चा रिमेक करण्यास ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चनने दिला नकार

या बॉलिवूड कपलला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स आतुरत आहेत ती जोडी म्हणजे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनची. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती दोघे लवकरच एकत्र झळकणार आहेत. बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा गाजलेला चित्रपट 'अभिमान'च्या रिमेकमध्ये दोघे दिसणार आहेत. प्रेक्षक ऐश्वर्या आणि अभिषेकच्या जोडीला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक होते. मात्र असे कळतेय की फॅन्सचे हे स्वप्न अधुरेच राहाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे अनुराग कश्यपच्या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचे समजते आहे.  

ALSO READ : IIFA मध्ये तिरंगा फडकविणारी ऐश्वर्या राय-बच्चन ठरणार पहिली भारतीय महिला!

एक मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या 'अभिमान'च्या रिमेकसाठी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र या दोघांनी हे करण्यास नकार दिला. अभिषेकच्या म्हणण्यानुसार अशा क्लासिक चित्रपटांना हात लावू नये. म्हणून त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2010 आलेल्या मणिरत्नम यांच्या 'रावण' या चित्रपटात दिसले होते. ऐश्वर्या राय ओम प्रकाश मेहरा यांच्या 'फन्ने खान'मध्ये दिसणार आहे. 2018च्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 17 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अनिल कपूर एकत्र काम करणार आहे. तर राजकुमार रावसोबत या चित्रपटात तिच्याबरोबर रोमांस करताना दिसणार असल्याचे कळतेय. राजकुमारसोबत या भूमिकेसाठी विकी कौशलचे नाव ही रेसमध्ये आहे.  2000 मध्ये आलेल्या हॉलिवूड चित्रपट एव्हरीबडीचा हा चित्रपट हिंदी व्हर्जन आहे. 

Web Title: Aishwarya Rai - Abhishek Bachchan refused to remake 'Abhimaan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.