आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरच्या जोडीचा शुभ मंगल सावधानचा टीजर आऊट..
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:40 IST2017-07-29T10:03:29+5:302017-07-29T15:40:50+5:30
आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट शुभ मंगल सावधाना चित्रपटचा टीजर आऊट झाला आहे.

आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकरच्या जोडीचा शुभ मंगल सावधानचा टीजर आऊट..
न र्माता आनंद एल राय मोस्ट अवेटेड चित्रपट शुभ मंगल सावधान चा टीजर नुकताच आऊट झाला आहे.चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन वर्षांनंतर भूमी पेडणेकर आणि आयुषमान खुराना यांची जोडी पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांनामध्ये अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे आणि चित्रपटाच्या टीजरने प्रेक्षकांची ही उत्सुकता वाढवली आहे. आर. एस. प्रसन्ना ने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 1 ऑगस्टला या चित्रपटाचा ट्रेलर आऊट होणार आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे. यात तुम्हाला रेडिओच्या जगातील निलेश मिश्रा आवाज सुद्धा ऐकू येणार आहे. नॉन कूल मुदित शर्मा आणि नॉन हॉट सुगंधा जोशी यांची मजेदार गोष्ट तुम्हाला यात पाहता येणार आहेत. ज्या प्रकारे प्रेक्षकांना चित्रपटाचा टीजर आवडला आहे तसाच ट्रेलर ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असा अंदाज बांधण्यात येतो आहे. आनंद एल राय यांनी या चित्रपटात छोट्या शहरातला रोमान्स, मनोरंजन वेगवेगळ्या अंदाजात दाखवले आहे.
हा चित्रपट आनंद एल राय यांनी खास स्टाइलमध्ये तयार केला आहे. आयुषमान आणि भूमीच्या जोडीचा हा दुसरा चित्रपट आहे. या दोघांमधील केमिस्ट्री पडद्यावर बघण्यास त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. या आधी ही जोडी दम लगा के हईशा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 1 सप्टेंबरला हा चित्रपट अजय देवगणच्या बादशाहो सोबत रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांची टक्कर होताना दिसणार आहे.