शाहरूख, सलमानला सोडा; महाराष्ट्राचा जावई असलेल्या महेश बाबूची कमाई बघा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 17:47 IST2020-08-09T17:47:04+5:302020-08-09T17:47:55+5:30
साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याचा आज वाढदिवस.

शाहरूख, सलमानला सोडा; महाराष्ट्राचा जावई असलेल्या महेश बाबूची कमाई बघा!!
साऊथच्या सिमनेमातील स्टार महेशबाबू याचा आज वाढदिवस. महेशबाबूचा जन्म 9 ऑगस्ट 1975 रोजी तामिळनाडूमधील चेन्नई येथे झाला. साऊथचे सुपरस्टार कृष्णा यांचा महेश बाबू हा मुलगा. चाहते महेशबाबूला प्रिंस स्टार म्हणून ओळखतात. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांसाठी सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे महेश बाबू. आज आम्ही तुम्हाला महेश बाबूबाबत माहित नसलेल्या काही खास गोष्टी सांगणार आहोत.
महेश बाबू टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणा-्या अभिनेत्यांपैकी एक आहे. महेश बाबून बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महेश बाबू एका सिनेमासाठी 20 ते 25 कोटींचे मानधन घेतो.
महेश बाबूचे स्वत:च पण एक प्रोडक्शन हाऊस आहे. त्याने या बॅनर खाली अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. 1999मध्ये प्रर्दर्शित झालेल्या ‘राजा कुमारुदु’ या चित्रपटातून महेश बाबूने अभिनेत्री प्रिती झिंटासोबत स्क्रिन शेअर करत आपल्या करियरची सुरूवात केली.
रिपोर्टनुसार महेश बाबूकडे जवळपास 135 कोटींची प्रॉपर्टी आहे. महेश बाबूचा हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १४ कोटी रुपये आहे.
महेश बाबूकडे सर्व सोयीसुविधा असलेली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटीची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये इतकी आहे. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे.
महेश बाबूला कारचा फार शौक असून त्याच्याकडे अनेक महागड्या कार्सचे कलेक्शन आहे. त्यामध्ये Lamborghini Gallardo (3 कोटी रुपये), Range Rover Vogue (1.6 कोटी रुपये), Toyota Land Cruiser (1.25 कोटी रुपये), Mercedes Benz E class (49 लाख रुपये), Audi A 8 (1.30 कोटी रुपये) यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.