पुन्हा एकदा रजनीकांत-अक्षय कुमारच्या ‘२.०’ रिलीज डेट पुढे ढकलली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:18 IST2018-01-31T08:48:22+5:302018-01-31T14:18:22+5:30

रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या फॅन्स ‘२.०’ चित्रपटाची अजून वाट बघावी लागणार आहे. याआधी हा चित्रपट गतवर्षीच्या दिवाळीत रिलीज केला ...

Again, Rajinikanth and Akshay Kumar postponed the release date of 2.0? | पुन्हा एकदा रजनीकांत-अक्षय कुमारच्या ‘२.०’ रिलीज डेट पुढे ढकलली ?

पुन्हा एकदा रजनीकांत-अक्षय कुमारच्या ‘२.०’ रिलीज डेट पुढे ढकलली ?

नीकांत आणि अक्षय कुमारच्या फॅन्स ‘२.०’ चित्रपटाची अजून वाट बघावी लागणार आहे. याआधी हा चित्रपट गतवर्षीच्या दिवाळीत रिलीज केला जाणार होता. मात्र त्याची रिलीज डेट 26 जानेवारी करण्यात आली मात्र यादिवशी अक्षय कुमारचा पॅडमॅन रिलीज होत असल्याने मकर्सने ‘२.०’  रिलीज डेट  एप्रिलमध्ये ठरवण्यात आली होती. मात्र आता ही रिलीज डेटसुद्धा  आणखीन पुढे सरकवण्यात आली आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार आता हा चित्रपट जुलै किंवा ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर यांनी ही माहिती ट्वीटरवरुन दिली. हैदराबादमध्ये चित्रपटाचा एक टीजर रिलीज केला जाणार आहे त्यावेळी चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत घोषणा केली जाईल. हा चित्रपट 450 कोटींचा बिग बजेट आहे. याचित्रपटाचे डिस्ट्रीब्यूशन राईट्स जवळपास 16 कोटींना विकण्यात येत आहेत. चित्रपटात अक्षय कुमार आणि रजनीकांत यांच्याशिवाय  त्याचबरोबर एमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसेन यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 7 हजार स्क्रिनवर रिलीज करण्यात येणार आहे. 

‘२.०’ हा चित्रपट रजनीकांत यांच्याच २०१० मध्ये आलेल्या  ‘रोबोट’चा सीक्वल आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याबरोबर ऐश्वर्या राय-बच्चन लीड रोलमध्ये बघावयास मिळाली होती. या चित्रपटात रजनीकांत यांनीच नायक आणि खलनायकाची भूमिका साकारली होती. यावेळी खलनायकाच्या भूमिकेत अक्षयकुमार दिसणार असून, तो खूपच खतरनाक दाखविण्यात येणार आहे, तर रजनीकांत पुन्हा एकदा डॉक्टर वसीकरण आणि रोबोट चिट्टीच्या भूमिकेत असणार आहेत.   

येत्या 9 फेब्रुवारीला अक्षय कुमारचा पॅडमॅन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पॅडमॅन या चित्रपटात अरुणाचल मधील मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष आणि स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ट्विंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पदार्पण करते आहे. या ट्रेलरमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. 

Web Title: Again, Rajinikanth and Akshay Kumar postponed the release date of 2.0?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.