'अफ्लाईंग जाट' बॉलिवूडला नवा 'सुपरहिरो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:53 IST2016-01-16T01:16:27+5:302016-02-06T10:53:22+5:30
'अफ्लाईंग जाट'द्वारे बॉलिवूडला लवकरच नवा 'सुपरहिरो' मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहे. या ...
.jpg)
'अफ्लाईंग जाट' बॉलिवूडला नवा 'सुपरहिरो'
' ;अफ्लाईंग जाट'द्वारे बॉलिवूडला लवकरच नवा 'सुपरहिरो' मिळणार आहे. बालाजी मोशन पिक्चरच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ व जॅकलिन फर्नाडिस यांच्या मुख्य भूमिका असून आंतरराष्ट्रीय अँक्शन स्टार नॅथन जोन्स (मॅडमॅक्स फेम) खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली आहे. टायगरचा सुपरहिरोचा पोशाख यात खास आकर्षण आहे. युवकांच्या मनातील कल्पना लक्षात घेत त्याचे डिझाईन करण्यात आले आहे. टायगर श्रॉफच्या पर्सनॅलिटीला सूट होईल असा कॉस्टुम लॉस वेगासमध्ये बनविण्यात आला आहे. तब्बल 11 कॉस्टुमनंतर हा ड्रेस निवडण्यात आला आहे. हा सिनेमा युनिव्हर्सल अपील करेल, असा टायगरचा दावा आहे.