रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 12:36 PM2022-02-02T12:36:30+5:302022-02-02T12:37:06+5:30

होय, आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण हो, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या सुटा बुटातील नोकरीला लाथ मारली होती.

after watching ranbir kapoor and deepika padukone film tamasha many people quit their jobs imtiaz ali reveals | रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण?

रणबीर-दीपिकाचा ‘हा’ सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी सोडली होती नोकरी, काय होतं कारण?

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor )अनेक शानदार सिनेमे दिलेत. अनेक हिट सिनेमात, अनेक हिट अभिनेत्रींसोबत त्याने कामं केलं. 2015 मध्ये रणबीर दीपिका पादुकोणसोबत (Deepika Padukone) दिसला. या सिनेमाचं नाव होतं, तमाशा (Tamasha). हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. पण हो, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या नोकरीला लाथ मारली होती. होय, आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे.
इम्तियाज अली ( Imtiaz Ali) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. आता खुद्द इम्तियाज यांनी या चित्रपटाबद्दल खुलासा केला आहे.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘तमाशा’ पाहिल्यानंतर अनेक लोक मला येऊन भेटले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही नोकरी सोडली, असं त्यांनी मला सांगितलं होतं. त्याक्षणी यावर काय बोलावं हे मला समजेना. बॉस, तुम्ही जे काही प्रोफेशन निवडाल, ते निवडा. पणत्यात बेस्ट द्या. कारण उद्या जर तुम्ही त्यात अयशस्वी झालात तर तुम्ही मलाच शोधाल आणि माराल.  तुमच्यामुळे मी नोकरी सोडली, असं तुम्हीच उद्या मला म्हणालं, असं मी त्यांना म्हणालो होतो.

रणबीर कपूरने निर्माते इम्तियाज अलीच्या यांच्यासोबत ‘रॉकस्टार’ आणि ‘तमाशा’ या दोन चित्रपटात काम केलं. ‘तमाशा’ या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाची कथा स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका तरूणाची आधारित होती. इम्तियाज अली आधी चित्रपटाचं नाव ‘विन्डो सीट’ ठेवणार होतं. पण नंतर हे नाव बदलून ‘तमाशा’ असं चित्रपटाचं नामकरण करण्यात आलं. या चित्रपटासाठी अनुष्का शर्मा ही इम्तियाज यांची पहिली पसंत होती. तिने नकार दिल्यावर ही भूमिका दीपिकाला मिळाली होती.

  

Web Title: after watching ranbir kapoor and deepika padukone film tamasha many people quit their jobs imtiaz ali reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.