मंदिरा बेदीने पोस्ट केलेला फोटो बघून यूजर्सनी म्हटले, ‘म्हातारपणात असे फोटो पोस्ट करू नये’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:51 IST2017-12-28T10:20:29+5:302017-12-28T15:51:57+5:30

टीव्ही जगतात ‘शांती’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या सोशल मीडियावर तिच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आहे. ...

After watching the photo of Mandira Bedi, the user said, 'Do not post such photos in old age'! | मंदिरा बेदीने पोस्ट केलेला फोटो बघून यूजर्सनी म्हटले, ‘म्हातारपणात असे फोटो पोस्ट करू नये’!

मंदिरा बेदीने पोस्ट केलेला फोटो बघून यूजर्सनी म्हटले, ‘म्हातारपणात असे फोटो पोस्ट करू नये’!

व्ही जगतात ‘शांती’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मंदिरा बेदी सध्या सोशल मीडियावर तिच्या एका फोटोमुळे चांगलीच चर्चेत आहे. मंदिराने तिचा एक फोटो शेअर केला असता, त्यावरून ती ट्रोल होत आहे. यूजर्स मंदिराच्या या फोटोला वल्गर असे संबोधतांना अपशब्दात कॉमेण्ट पोस्ट करीत आहेत. मंदिरा नेहमीच सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करीत असते. ती फिटनेस फ्रीक असून, आपल्या बॉडीवर खूप मेहनत घेत असते. गेल्या २७ डिसेंबर रोजी मंदिराने असाच एक फोटो तिच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला. या फोटोमध्ये मंदिरा व्हाइट शर्टमध्ये दिसत असून, तिचे आंतरवस्त्र दिसत आहेत. मात्र मंदिराचा हा बोल्ड अंदाज नेटिझन्सना अजिबातच पसंत आला नसल्याने तिच्या या फोटोवर अतिशय अशलाघ्य भाषेत त्यांच्याकडून कॉमेण्ट पोस्ट केल्या जात आहेत.  एका यूजर्सने लिहिले की, ‘जेव्हा लोक तुम्हाला भाव देणे बंद करतात तेव्हा तुम्ही अशाप्रकारचे फोटो पोस्ट करून लोकप्रियता मिळविण्याचा प्रयत्न करता. हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट आहे.’ तर एका यूजर्सने म्हटले, ‘म्हातारपणात यांना असे कसे सुचते?’



वास्तविक मंदिराला पहिल्यांदाच फोटोवरून ट्रोल केले जात आहे, असे नाही. तर यापूर्वीही तिला असा सामना करावा लागला आहे. याच वर्षी मार्च महिन्यात जेव्हा तिने तिच्या बेस्ट फ्रेंडच्या ओठांवर किस केले होते, तेव्हा यूजर्सनी तिच्यावर टीकेची झोड उठविली होती. दरम्यान, मंदिराला छोट्या पडद्यावरील ‘शांती’ या नावाने ओळखले जाते. याच भूमिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. मंदिराने तिच्या करिअरची सुरूवात टीव्ही जगतातून केली. त्यानंतर ती काही चित्रपटांमध्येही बघावयास मिळाली. मंदिराने इमेज बदलण्यासाठी क्रिकेट होस्ट करणारी पहिली महिला म्हणूनही काम केले. 



दरम्यान, मंदिराने गेल्या २५ डिसेंबर रोजी पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्यासोबत एका फिटनेस ब्रॅण्डच्या जाहिरातीचे शूटिंग केले. याच तारखेला २१ वर्षांपूर्वी राज आणि मंदिराची पहिली भेट झाली होती. पुढे या भेटीचे प्रेमात रूपांतर झाले. 

Web Title: After watching the photo of Mandira Bedi, the user said, 'Do not post such photos in old age'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.