Kantara : ‘कांतारा’ पाहिला आणि मुलाखत घेणाऱ्या युट्युबरने थेट ऋषभ शेट्टीचे पाय धरले...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:24 PM2022-10-20T15:24:37+5:302022-10-20T15:25:09+5:30

Kantara : 14 ऑक्टोबरला ‘कांतारा’ हिंदीत रिलीज झाला. ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. सगळेच ‘कांतारा’ दिग्दर्शित करणाऱ्या आणि त्यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीच्या प्रेमात पडले आहेत....

after watch kantara a famous youtuber fell at rishabh shetty feet during an interview | Kantara : ‘कांतारा’ पाहिला आणि मुलाखत घेणाऱ्या युट्युबरने थेट ऋषभ शेट्टीचे पाय धरले...!!

Kantara : ‘कांतारा’ पाहिला आणि मुलाखत घेणाऱ्या युट्युबरने थेट ऋषभ शेट्टीचे पाय धरले...!!

googlenewsNext

 एकीकडे बॉलिवूडचे सिनेमे दणकून आपटत असताना साऊथच्या एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘कांतारा’ (Kantara ). होय, मूळ कन्नडमध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने 20 दिवसांत जगभरात 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. एकट्या भारतात या चित्रपटाने 170 कोटींचा बिझनेस केला आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी हा सिनेमा हिंदीसह अन्य तीन भाषांमध्ये डब केला. 14 ऑक्टोबरला ‘कांतारा’ हिंदीत रिलीज झाला. ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. सगळेच ‘कांतारा’ दिग्दर्शित करणाऱ्या आणि त्यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty )प्रेमात पडले आहेत. ‘कांतारा’ची कथा ऋषभ शेट्टीनं लिहिली आहे. तोच या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि त्याने या चित्रपटात लीड रोल साकारला आहे. त्याचा एक व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

सूरज कुमार नावाचा एक लोकप्रिय युट्यूबर ‘कांतारा’ पाहून इतका भारावला की, त्याने थेट ऋषभ शेट्टीला दंडवतच घातला. त्याचाच हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत युट्युबर ऋषभ शेट्टीची मुलाखत घेताना दिसतोय. मात्र मुलाखत सुरू करण्याआधी तो ऋषभला उभं राहण्याची विनंती करतो. ऋषभ शेट्टी आपल्या खुर्चीवर उठून उभं राहतात आणि युट्यूबर थेट   त्याच्या पायावर लोटांगण घालतो. ऋषभ त्याला उठवतो... यावर युट्यूबर भावुक होऊन बोलू लागतो. सर, मी आत्तापर्यंत अनेक सिनेमे पाहिलेत... पण ‘कांतारा’ पाहिल्यानंतर मी नि:शब्द झालोय.... माझ्याकडे या चित्रपटाचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत.... लोकप्रिय युट्यूबर सूरज कुमारचे हे शब्द ऐकून ऋषभही भावुक होतो. तो सूरज कुमारला प्रेमाने जवळ घेऊन त्याला मिठी मारतो.

‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनने केली इतकी कमाई
केवळ 16 कोटी बजेटमध्ये बनलेल्या ‘कांतारा’ या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 13.10 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनने 1.27 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 2.75 कोटी, तिसऱ्या दिवशी 3.50 कोटी, पाचव्या दिवशह 1.75 कोटी आणि सहाव्या दिवशी 1.88 कोटींचा बिझनेस केला. काल बुधवारी या चित्रपटाने 1.95 कोटींचा गल्ला जमवला.

Web Title: after watch kantara a famous youtuber fell at rishabh shetty feet during an interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.