वृंदावननंतर अयोध्यामध्ये दिसले विराट-अनुष्का, व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 18:51 IST2025-05-15T18:50:31+5:302025-05-15T18:51:04+5:30

Virat Kohli-Anushka Sharma : क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नुकतेच प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे.

After Vrindavan, Virat Kohli-Anushka Sharma seen in Ayodhya, video surfaced | वृंदावननंतर अयोध्यामध्ये दिसले विराट-अनुष्का, व्हिडीओ आला समोर

वृंदावननंतर अयोध्यामध्ये दिसले विराट-अनुष्का, व्हिडीओ आला समोर

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी नुकतेच प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या मुलांसोबत वामिका आणि अकाय यांच्यासोबत दिसत आहेत. हा व्हिडीओ अयोध्यामधला आहे.

विराटचे कुटुंब अयोध्येत अनुष्काच्या माहेरी, मुलांच्या आजीकडे गेले आहे. व्हिडीओमध्ये अनुष्का तिच्या मुलाला अकायला कडेवर घेऊन तिच्या आईच्या घरी पोहोचली आहे. तिची मुलगी वामिका जवळच उभी असल्याचे दिसून येते, जी तिच्या आईकडे काळजीपूर्वक पाहत आहे. अनुष्काची आई दारात त्यांचे स्वागत करताच ती आनंदाने अकयला जवळ घेते आणि वामिकाला प्रेमाने मिठी मारते.


यानंतर संपूर्ण कुटुंब घरात जाते. व्हिडीओमध्ये विराट कोहली देखील क्षणभर दिसतो, ज्यामुळे चाहते आणखी उत्साहित झाले. हा व्हिडीओ एका फॅन पेजद्वारे शेअर करण्यात आला होता, ज्यामुळे लोकांना या कुटुंबाची झलक पाहायला मिळाली. परंतु, विराट आणि अनुष्का त्यांच्या मुलांचे फोटो सार्वजनिक करत नसल्यामुळे, व्हिडीओमध्ये वामिका आणि अकायच्या चेहऱ्यावर स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

अनुष्का आणि विराटचं लग्न
अनुष्का आणि विराटची भेट २०१३ मध्ये एका टेलिव्हिजन जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले, परंतु त्यांनी ते बराच काळ खाजगी ठेवले. २०१७ मध्ये त्यांनी इटलीमध्ये एका खाजगी लग्न केले. जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी त्यांच्या पहिली मुलगी वामिकाचे स्वागत केले आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये मुलगा अकायचा जन्म झाला.

वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अनुष्का शर्मा लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात दिसणार आहे, हा चित्रपट महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. या चित्रपटात अनुष्का सहा वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करते आहे. ती शेवटची शाहरुख खान आणि कतरीना कैफसोबत 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. 'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

Web Title: After Vrindavan, Virat Kohli-Anushka Sharma seen in Ayodhya, video surfaced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.