'तान्हाजी'नंतर अजय देवगण-काजोल पुन्हा झळकणार ऐतिहासिक चित्रपटात, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 09:53 AM2021-03-23T09:53:29+5:302021-03-23T09:54:02+5:30

अजय देवगण-काजोल शेवटचे तान्हाजी या चित्रपटात दिसले होते.

After 'Tanhaji', Ajay Devgn-Kajol will play the role again in the historical film | 'तान्हाजी'नंतर अजय देवगण-काजोल पुन्हा झळकणार ऐतिहासिक चित्रपटात, साकारणार ही भूमिका

'तान्हाजी'नंतर अजय देवगण-काजोल पुन्हा झळकणार ऐतिहासिक चित्रपटात, साकारणार ही भूमिका

googlenewsNext

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक कपल म्हणजे अजय देवगण आणि काजोल. त्या दोघांनी बऱ्याच सिनेमात एकत्र काम केले आहे. ते शेवटचे तान्हाजी या ऐतिहासिक चित्रपटात झळकले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार असल्याचे समजते आहे. 'आदिपुरुष'मध्ये लवकरच काजोल आणि अजय देवगणचीदेखील एन्ट्री होणार असल्याचे बोलले जात आहे. 


प्रभासच्या आगामी 'आदिपुरुष' चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच तो प्रसिद्धीच्या झोतात आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखालील या चित्रपटात प्रभास हा राम आणि सैफ अली खान हा लंकेशच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात नुकतीच क्रिती सनॉन आणि सनी सिंग यांनाही कास्ट करण्यात आले आहे. यात क्रिती ही सीता, तर सनी सिंग हा लक्ष्मणची भूमिका साकारत आहे. 


रामाच्या कथेत शंकर देवाचाही उल्लेख होतो. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांनी देव शंकर आणि माता सतीच्या भूमिकेसाठी अजय आणि काजोलचा विचार करत आहे. मात्र अद्याप याबद्दल अधिकृत काहीही माहिती आलेली नाही.  आदिपुरूषचे दिग्दर्शन ओम राउत करत आहे. त्यानेच काजोल आणि अजय देवगणचा चित्रपट तान्हाजीचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटातील काजोल आणि अजयची जोडी चाहत्यांना खूप भावली होती आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.


दरम्यान, प्रभास हा बॉलीवूडमधील अभिनेत्रींचा चाहता आहे. यासाठीच त्याने आपल्या अन्य एका चित्रपटात 'राधे श्‍याम'मध्ये अभिनेत्री भाग्यश्रीला पसंती दिली होती. आता या चित्रपटासाठी त्याने काजोलचे नाव सुचविले आहे. या चित्रपटात प्रभाससोबत काम करण्यासाठी काजोल उत्साहित आहे. परंतु याला काजोलने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Web Title: After 'Tanhaji', Ajay Devgn-Kajol will play the role again in the historical film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.