​नवाजुद्दीन सिद्धीकीच्या वक्तव्यानंतर निहारिका सिंह का टाळतेय मीडियाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:03 IST2017-10-24T07:33:33+5:302017-10-24T13:03:33+5:30

नवाजुद्दीन सिद्दीकी आजवर केवळ त्याच्या करियरसाठी चर्चेत राहिला आहे. पण पहिल्यांदाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आला आहे. त्याचे ...

After the statement of Nawazuddin Siddiqui, does Niharika Singh avoid the media? | ​नवाजुद्दीन सिद्धीकीच्या वक्तव्यानंतर निहारिका सिंह का टाळतेय मीडियाला?

​नवाजुद्दीन सिद्धीकीच्या वक्तव्यानंतर निहारिका सिंह का टाळतेय मीडियाला?

ाजुद्दीन सिद्दीकी आजवर केवळ त्याच्या करियरसाठी चर्चेत राहिला आहे. पण पहिल्यांदाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आला आहे. त्याचे एन ऑर्डिनरी लाईफ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. यात नवाजने त्याच्या खाजगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत. त्याचे एका अभिनेत्रीसोबत प्रेमप्रकरण असल्याचे त्याने या पुस्तकात म्हटले आहे. ही अभिनेत्री निहारिका सिंह असून तिने आणि नवाजने २०१२ मध्ये मिस लवली या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होते असा नवाजने त्याच्या पुस्तकात उल्लेख केला आहे. त्याच्या या पुस्तकाची सध्या मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे. नवाजने निहारिका आणि त्याचे प्रेमप्रकरण लोकांच्या समोर आणल्यानंतर निहारिका यावर काय भाष्य करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण या प्रकरणानंतर निहारिकाने मौन राखणेच पसंत केले आहे. निहारिकाने मीडिया प्रतिनिधींचे फोन उचलणे बंद केले आहे. त्यामुळे आता निहारिका मीडियाला का टाळतेय हे केवळ तीच सांगू शकेल. 
नवाजुद्दीनने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, निहारिका ही एक समजूतदार मुलगी होती. ती स्वतः अभिनेत्री असल्यामुळे तिला माझे काम आणि माझ्या मेहनतीची जाणीव होती. ती मला दिवसभरात खूप वेळा फोन करायची आणि माझ्या कामाबद्दल विचारपूस करायची. ती माझ्याकडून फक्त प्रेमाच्या दोन शब्दांची अपेक्षा ठेवयाची जे मी तिला कधीच देऊ शकलो नाही. मी स्वार्थी होतो माझे ध्येय निश्चित होते मला केवळ माझ्या शरीराची भूक भागवायची होती. पण हळूहळू तिच्या हे लक्षात आले आणि तिने माझ्याशी नाते तोडले.
निहारिका सिंहने २००५ मध्ये फेमिना मिस इंडिया चा 'किताब पटकावला होता. त्यानंतर ती बॉलिवूडकडे वळली आणि मिस लवली चित्रपटातून तिने डेब्यू केले. त्यानंतर ती अ न्यू लव्ह स्टोरी, सोहरा ब्रीज, अन्वर का अजब किस्सा अशा काही चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.

Also Read : नवाजुद्दीन सिद्धीकी निहारिका सिंहसोबतच्या अफेअरला घेऊन आला चर्चेत

Web Title: After the statement of Nawazuddin Siddiqui, does Niharika Singh avoid the media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.