शाहरुख खाननंतर आता क्रिती सनॉनचा युएई सरकारकडून सन्मान; मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 02:44 PM2024-01-26T14:44:04+5:302024-01-26T14:46:27+5:30

 क्रितीला यूएईकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

After Shah Rukh Khan, now Kriti Sanon honored by UAE government; Got Dubai Golden Visa | शाहरुख खाननंतर आता क्रिती सनॉनचा युएई सरकारकडून सन्मान; मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा

शाहरुख खाननंतर आता क्रिती सनॉनचा युएई सरकारकडून सन्मान; मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत क्रिती सेनॉनने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. क्रिती सेनॉन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. क्रितीच्या शिरपेचात नव्याने मानाचा तुरा रोवला गेला आहे.  शाहरुख खाननंतर आता क्रिती सनॉनचा युएई सरकारकडून सन्मान करण्यात आला आहे. 

 क्रितीला यूएईकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. याआधी संजय दत्त, शाहरुख खान, रणवीर सिंग या व्यक्तींना हा व्हिसा मिळालेला आहे. ईसीएच डिजिटलचे सीईओ इक्बाल मार्कोनी यांच्याकडून क्रिती सेननला हा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. UAE सरकारकडून मिळणाऱ्या गोल्डन व्हिसासाठी अभिनेत्रीने २०१९ मध्येच प्रक्रियेला सुरूवात केली होती. अखेर अभिनेत्रीला तिचा व्हिसा मिळाला आहे.

यूएई सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "UAEचा गोल्डन व्हिसा मिळणे हा सन्मान आहे. दुबई देशाप्रती माझ्या मनामध्ये एक विशेष स्थान आहे आणि मी आता त्यांच्या संस्कृतीचा भाग बनण्यास उत्सुक आहे.  तर संयुक्त अरब अमिरात गोल्डन व्हिसा सहजासहजी कोणत्याही नागरिकाला देत नाही. यूएईकडून हा व्हिसा जगातील मान्यवर व्यक्तींना दिला जातो. हा व्हिसा दहा वर्षांसाठी देण्यात येतो त्यानंतर पुढं त्याचं नूतनीकरण केलं जातं. 

क्रितीच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर, ती 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात क्रिती पहिल्यांदाच शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.  हा चित्रपट 9 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात क्रिती ही रोबोटच्या भूमिकेत असणार आहे. तर याआधी क्रिती 'गणपत' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटात ही अभिनेत्री टायगर श्रॉफसोबत दिसली होती. 

Web Title: After Shah Rukh Khan, now Kriti Sanon honored by UAE government; Got Dubai Golden Visa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.