'सेक्रेड गेम्स'नंतर नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे ह्या प्रोजेक्टसाठी येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 15:12 IST2018-08-13T15:07:49+5:302018-08-13T15:12:52+5:30
हनी त्रेहन त्याच्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे यांना घेण्याचा विचार करत असल्याचे समजते आहे.

'सेक्रेड गेम्स'नंतर नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे ह्या प्रोजेक्टसाठी येणार एकत्र
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांची सेक्रेड गेम्स ही वेबसीरिज चांगलीच गाजली आणि यातील सर्व कलाकारांचे काम प्रेक्षकांना खूप भावले. आता हे दोघे रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
हनी त्रेहन त्याच्या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी व राधिका आपटे यांना घेण्याचा विचार करत असल्याचे समजते आहे. 'रात अकेली है' असे या सिनेमाचे नाव आहे. हनी कास्टिंग डायरेक्टर आहेत आणि विशाल भारद्वाजसोबत सहदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. सूत्राच्या माहितीनुसार, नवाज आणि राधिकाची 'रात अकेली है' या चित्रपटात वर्णी लागली आहे.
ग्रामीण भारताच्या मागासल्यापणावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा खूपच सशक्त आहे, त्यामुळे हनीलादेखील अशीच एक सशक्त जोडी हवी होती. त्यामुळे हनी या दोघांना घेण्याचा विचार करत आहेत. नवाजुद्दीनसोबत आधीच चर्चा झाली होती मात्र हिरोइन फायनल झाली नव्हती. मात्र हनीने जेव्हा सेक्रेड गेम्स पाहिला तेव्हा त्याने राधिकाचे नाव फायनल केले. यानंतर त्याने राधिकाला अप्रोच केले. तीच यासाठी फिट असल्याचे तो म्हणाला. राधिकानेदेखील यासाठी होकार दिला असून तिला पटकथा आवडली आहे. सध्या चित्रीकरणासाठी लोकेशनचा शोध सुरू आहे. ऑक्टोबरपर्यंत हा चित्रपट तयार होईल. राधिका आणि नवाज यांनी यापूर्वी 'बदलापूर' (२०१५) आणि 'मांझी : द माउंटेन मन' (२०१५) मध्ये एकत्र काम केले आहे. मांझी सिनेमातील त्यांचे काम प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. 'रात अकेली है' या चित्रपटातून पु्न्हा एकदा ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यांचे चाहते या चित्रपटाबाबत आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.