रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:11 PM2023-11-08T13:11:03+5:302023-11-08T13:11:54+5:30

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा असा एक फोटो व्हायरल झाला आहे. 

after rashmika mandanna deepfake video sara tendulkar and shubman gill morphed photo viral | रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल

रश्मिकानंतर सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल डीपफेकचे शिकार, दोघांचा 'तो' फोटो व्हायरल

'पुष्पा' फेम रश्मिका मंदाना तिच्या डीपफेक व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. अभिनेत्रीचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओत अभिनेत्रीचा चेहरा ए़डिट करण्यात आला होता. रश्मिकानंतर कतरिना कैफचाही मॉर्फ फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत अभिनेत्रीला विचित्र कपडे घालण्यात आले होते. आता शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा असा एक फोटो व्हायरल झाला आहे. 

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर डेट करत असल्याच्या चर्चा बराच काळापासून सुरू आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत शुबमन खुर्ची बसलेला दिसत असून सारा त्याच्या गळ्यात हात घालून उभी असल्याचं फोटोत दिसत आहे. एका ट्वीटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला असून "शुबमन गिलला डेट करत असल्याचं साराने कन्फर्म केलं आहे", असं कॅप्शन देण्यात आलं आहे.  

पण, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचा हा फोटो मॉर्फ केलेला आहे. ओरिजिनल फोटोमध्ये साराबरोबर तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर आहे. साराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन अर्जुनबरोबरचा हा फोटो शेअर केला होता. याबरोबर तिने अन्य काही फोटोही शेअर केले होते. यातील एका फोटोत अर्जुनच्या जागी शुबमनचा फोटो एडिट करण्यात आला आहे. 

दरम्यान, शुबमनचं नाव अभिनेत्री सारा खानबरोबरही जोडलं गेलं होतं. 'कॉफी विथ करण ८'मध्ये सारा खानने पहिल्यांदाच शुबमनबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं. त्यामुळे पुन्हा एकदा शुबमन आणि सारा तेंडुलकरच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. 

Web Title: after rashmika mandanna deepfake video sara tendulkar and shubman gill morphed photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.