'रेस 3' नंतर रेमो डिसोझाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार सलमान खान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 15:02 IST2018-06-01T09:32:00+5:302018-06-01T15:02:00+5:30
सलमान खान सध्या 'रेस 3'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर सलमान खान रेमो डिसोझाच्या डान्सवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. या ...
.jpg)
'रेस 3' नंतर रेमो डिसोझाच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार सलमान खान
स मान खान सध्या 'रेस 3'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानंतर सलमान खान रेमो डिसोझाच्या डान्सवर आधारित चित्रपटात दिसणार आहे. या गोष्टीचा खुलासा सलमानने स्वत: मीडियाशी बोलताना केला. सलमानने सांगितले की, अली अब्बास जफरच्या भारत आणि प्रभुदेवाच्या दबंग3 नंतर तो रेमो डिसोझाच्या डान्सवर आधारित चित्रपट झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला थांबवण्यात आल्याची चर्चा होती. मुंबई मिररशी बोलताना सलमान म्हणाला की, गतवर्षी मला आणि रेमोला एक डान्सवर आधारित चित्रपट तयार करायचा होता पण त्यावेळी चित्रपटातील एक सीन शूट करताना माझ्या खांदयाला दुखापत झाली आणि तो चित्रपट होल्डवर गेला. त्यानंतर मी रेस 3 आला आणि आता डान्सवर आधारित चित्रपटदेखील कन्फर्म केला आहे. या चित्रपटासाठी मी ट्रेनिंग घेणार आहे. पुढे सलमान म्हणाला, दबंग टूरवरुन आल्यावर मी 'भारत' आणि 'दबंग3' च्या कामाला लागणार आहे. या चित्रपटांनंतर मी लगेच रेमोच्या प्रोजेक्टवर लागणार आहे कारण सध्या 'किक 3'ची स्क्रिप्ट तयार नाही आहे.
रेस-३’मध्ये सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम बघावयास मिळणार आहेत. ताजी बातमी खरी मानाल तर, या चित्रपटासाठी बॉबी देओलपासून साकिब सलीम अशा सगळ्यांनाच तगडे मानधन देण्यात आले आहे. त्यामध्ये सस्पेन्स आणि अॅक्शनचा धमाका बघावयास मिळणार आहे. सलमान आणि जॅकलीन ही जोडी ‘किक’मध्ये बघावयास मिळाली होती. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित या चित्रपटाची निर्मिती टिप्स फिल्म्स बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. ईदच्या मुहूर्तावर भाईजानचा ‘रेस3’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
ALSO READ : ‘रेस-३’चा सर्वात मोठा धमाका; सलमान खानने डान्स फ्लोरवर लावली आग, पाहा व्हिडीओ!