पंतप्रधान मोदीनंतर स्मृती ईराणींनीही केले अदनान स्वामीच्या लाडक्या मदिनाचे स्वागत, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 18:57 IST2017-09-19T13:27:59+5:302017-09-19T18:57:59+5:30

केंद्रीयमंत्री स्मृती ईराणी यांचा गायक अदनान सामीच्या मुलीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. हा फोटो ...

After the Prime Minister, Smriti Irani also visited Adnan Swamar's favorite day, see photos! | पंतप्रधान मोदीनंतर स्मृती ईराणींनीही केले अदनान स्वामीच्या लाडक्या मदिनाचे स्वागत, पहा फोटो!

पंतप्रधान मोदीनंतर स्मृती ईराणींनीही केले अदनान स्वामीच्या लाडक्या मदिनाचे स्वागत, पहा फोटो!

ंद्रीयमंत्री स्मृती ईराणी यांचा गायक अदनान सामीच्या मुलीबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. हा फोटो अदनान सामी याने वर्ल्ड नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आहे. फोटोमध्ये स्मृती ईराणी अदनानची मुलगी मदिना हिला खेळविताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘एक फोटो हजार शब्द बोलून जातो, येथे फक्त प्रेमळ गोष्टी होत आहेत. स्मृती ईराणी आणि मदिनाने पहिल्याच नजरेत एकमेकांना पसंत केल्याचे हा फोटो सांगत आहे, धन्यवाद!’ यानंतर काही इतरही फोटो अपलोड करण्यात आले. ज्यामध्ये स्मृती यांनी मदिनाला कडेवर घेतल्याचे दिसत आहे. 

भारतीय नागरिकत्त्व स्वीकार केलेल्या अदनान सामी नेहमीच मुलगी मदिनाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर अपलोड करीत असतो. अदनानच्या या चिमुकल्या परीचा जन्म ९ मे २०१७ रोजी झाला. मदिना अदनान आणि त्याची तिसरी पत्नी रोया यांची मुलगी आहे. जेव्हा मदिनाचा जन्म झाला होता, तेव्हा अदनानने म्हटले होते की, ‘मदिना आमच्यासाठी सर्वात अनमोल आहे. मला आणि रोयाला सुरुवातीपासूनच मुलगी व्हावी अशी अपेक्षा होती. ती आमची ‘लकी चार्म’ आहे.’ त्याचबरोबर अदनानने असेही म्हटले होते की, ‘मदिनामुळे मला संगीताची नवी प्रेरणा मिळाली आहे. ती माझ्या विश्वाचा केंद्रबिंदू आहे.’



काही दिवसांपूर्वीच अदनान आणि त्याची पत्नी रोयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मदिनाचा गाल ओढून तिचे स्वागत केले होते. यावेळी अदनान यांनी पंतप्रधानांना मदिना शहरातून आणलेली मिठाई भेट दिली होती. त्यावेळी मोदी आणि मदिनाचा तो फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. आता स्मृती ईराणी यांच्यासोबतचा मदिनाचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे. 

Web Title: After the Prime Minister, Smriti Irani also visited Adnan Swamar's favorite day, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.