मीरा राजपूतला लागलेत डोहाळे, आता हवा शेजवान चीज डोसा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 11:43 IST2018-07-04T11:42:26+5:302018-07-04T11:43:00+5:30

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता प्रेग्नंसी म्हटल्यावर डोहाळे तर आलेच.

After pizza, pregnant Mira Rajput is craving Schezwan cheese dosa | मीरा राजपूतला लागलेत डोहाळे, आता हवा शेजवान चीज डोसा!

मीरा राजपूतला लागलेत डोहाळे, आता हवा शेजवान चीज डोसा!

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आता प्रेग्नंसी म्हटल्यावर डोहाळे तर आलेच. सध्या मीराला अनेक गोष्टींचे डोहाळे लागले आहेत. मीराच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नजर टाकली की, याची कल्पना आपसूक येईल. काल-परवा मीराला पिझ्झा आठवला होता. पिझ्झा खाण्याची इच्छा तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये बोलून दाखवली होती. कदाचित आता शेजवान चीज डोस्याचा नंबर आहे. होय, मीराने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेजवान वीज डोस्साचा फोटो शेअर केला आहे.

७ जुलै २०१५ रोजी शाहिद व मीराचे लग्न झाले होते. एक वर्षानंतर २६ आॅगस्टला त्यांच्या घरी मीशाचा जन्म झाला. मीशा आता उणीपुरी दीड वर्षांची आहे आणि आता मीरा पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे.
शाहिद कपूर व मीरा राजपूत या दोघांचे तसे अरेंज मॅरेज. शाहिद व मीराचे लग्न ठरले आणि अचानक मीरा चर्चेत आली होती़ म्हणजे अगदी लग्नाच्या आधीपासूनच मीडियात तिने स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले. आधी तर मीरा कोण, याबाबत लोकांना उत्सुकता होती. यानंतर तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. यानंतर मीराने मीशा नावाच्या गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर मीशा हेच मीराचे जग बनून जाईल, असे वाटले. पण मीरा आपली पर्सनल आणि सोशल लाईफ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करताना दिसतेय. तेही अगदी उत्तमरित्या.
मीशाच्या जन्मानंतर मीरा व शाहिद दोघेही करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’मध्ये दिसले होते़ या शोमध्ये मीशाच्या हजरजबाबी स्वभावाने सगळ्यांचीच मने जिंकली होती़ यानंतर मीरा बॉलिवूड डेब्यू करणार, अशाही बातम्या आल्या होत्या़ पण तूर्तास चित्रपटात काम करण्याचा माझा काहीही विचार नाही. अशा बातम्या कुठून येतात, हे मला कळत नाही,असे तिने अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत सांगितल होते़
करिअरबद्दल विचारले असता, मला लवकरात लवकर स्वत:ला कामात झोकून द्यायचे आहे. काही तरी क्रिएटीव्ह करण्याची योजना आहे. कामासोबतच मला कुटुंबासाठीही वेळ द्यायचा आहे. आमच्या दुस-या मुलाबद्दलही आम्ही विचार चालवला आहे, असे ती म्हणाली होती़

 

Web Title: After pizza, pregnant Mira Rajput is craving Schezwan cheese dosa