​‘पद्मावत’ नंतर ‘अय्यारी’ वादात! ऐन रिलीजच्या तोंडावर संरक्षण मंत्रालयाने घेतला आक्षेप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 12:54 IST2018-02-05T07:24:59+5:302018-02-05T12:54:59+5:30

‘पद्मावत’ या चित्रपटावरून होणारा वाद थांबतो ना थांबतो तोच नीरज पांडे यांचा ‘अय्यारी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. होय, ...

After 'Padmavat' 'Aayari' promise! Defense Ministry's objection to release of Ain !! | ​‘पद्मावत’ नंतर ‘अय्यारी’ वादात! ऐन रिलीजच्या तोंडावर संरक्षण मंत्रालयाने घेतला आक्षेप!!

​‘पद्मावत’ नंतर ‘अय्यारी’ वादात! ऐन रिलीजच्या तोंडावर संरक्षण मंत्रालयाने घेतला आक्षेप!!

द्मावत’ या चित्रपटावरून होणारा वाद थांबतो ना थांबतो तोच नीरज पांडे यांचा ‘अय्यारी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. होय, ‘अय्यारी’च्या रिलीजला उणापुरा आठवडा शिल्लक असताना संरक्षण मंत्रालयाने या चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या समिक्षा समितीने संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांसाठी ‘अय्यारी’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते. चित्रपट पाहिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी यात काही बदल सुचवल्याचे कळतेय. आता हे बदल कुठले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाच्या अधिका-यांनी शनिवारी दुपारी चित्रपट बघितला आणि त्यानंतर त्यातील अनेक दृश्यांवर आक्षेप नोंदवला.येत्या ९ फेब्रुवारी ला हा चित्रपट रिलीज होतोय. त्यामुळे रिलीजच्या ऐन तोंडावर हे बदल करावे लागणार आहेत.  आधीच देशाबाहेर पाठवण्यास ‘अय्यारी’ला विलंब झाला आहे. त्यात चित्रपटातील दृश्ये बदलावी वा एडिट करावी लागणार असल्याने ‘अय्यारी’च्या टीमला ऐनवेळी धावपळ करावी लागणार आहे.
या थ्रीलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी लष्करी अधिका-याच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटाला पास न करता, तो समिक्षा समितीकडे पाठवला होता. आधी हा चित्रपट गत २६ जानेवारीला रिलीज होणार होता. पण २५ जानेवारीला ‘पद्मावत’ रिलीज झाल्याने ‘अय्यारी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट ९ फेब्रुवारी ला अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’सोबत रिलीज होणार आहे.

ALSO READ : ‘पॅडमॅन’ने आणला सिद्धार्थ मल्होत्राला राग; अशी काढली भडास!!

‘अय्यारी’या अ‍ॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिद्धार्थ यात एक आर्मी आॅफिसर साकारणार आहे. यापूर्वी आलेले सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट धडाधड आपटले होते. ‘बार बार देखो’, ‘ए जेंटलमॅन’, ‘इत्तेफाक’ हे सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकले नाहीत. त्यामुळे सिद्धार्थला ‘अय्यारी’कडून विशेष अपेक्षा आहेत. 

Web Title: After 'Padmavat' 'Aayari' promise! Defense Ministry's objection to release of Ain !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.