Confirmed! ‘लुका छुपी’ नंतर सारा अली खानसोबत जमणार कार्तिक आर्यनची जोडी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 11:42 AM2019-03-01T11:42:37+5:302019-03-01T11:43:16+5:30

सारा अली खानला अभिनेता कार्तिक आर्यन आवडतो हे आता कुणापासून लपून राहिलेले नाही. साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

after luka chuppi kartik aaryans next film with sara ali khan | Confirmed! ‘लुका छुपी’ नंतर सारा अली खानसोबत जमणार कार्तिक आर्यनची जोडी!!

Confirmed! ‘लुका छुपी’ नंतर सारा अली खानसोबत जमणार कार्तिक आर्यनची जोडी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोणच्या ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता.  

सारा अली खानला अभिनेता कार्तिक आर्यन आवडतो हे आता कुणापासून लपून राहिलेले नाही. साराने कार्तिकला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अलीकडे लोकमत मोस्ट स्टाईलिश अवॉर्डमध्ये कार्तिक आर्यनला भेटण्याची सारा अली खानची इच्छा पूर्ण झाली होती. खुद्द ‘सिम्बा’  रणवीर सिंगने कार्तिक व साराची भेट घडवून आणली होती.  करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये सारा अली खानने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती. योगायोगाने ‘लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड’मध्ये कार्तिक व सारा दोघेही आलेत आणि रणवीरने नेमकी हीच संधी साधत दोघांचीही भेट घडवून आणली होती. नुसतीच भेट नाही तर दोघांचेही हात एकमेकांच्या हातात देत, सारा व कार्तिकची जाम मजा घेतली होती.

आता साराची यापुढची इच्छा पूर्ण होणार आहे. होय, सैफ अली खानची ही लाडकी लेक आता कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अर्थात आॅनस्क्रीन रोमान्स. होय, लवकरच ही जोडी इम्तियाज अलीच्या चित्रपटात दिसणार आहे. सारा व कार्तिकचा हा चित्रपट ‘लव आज कल’चा सीक्वल असल्याचे म्हटले जातेय. अर्थात अद्याप याबाबत कुठलीही घोषणा झालेली नाही. सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुड्डासुद्धा  यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.
 २००९ मध्ये आलेल्या सैफ अली खान व दीपिका पादुकोणच्या ‘लव आजकल’ सुपरडुपर हिट झाला होता.   इम्तियाज अली हा जब वी मेट, लव्ह आज कल , तमाशा  यांसारख्या अनोख्या प्रेमकहाणींसाठी, चित्रपटांसाठी  प्रसिद्ध आहे. आता सारा व कार्तिकला घेऊन ती काय घेऊन येतात, ते बघूच.
 
 

Web Title: after luka chuppi kartik aaryans next film with sara ali khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.