इंदर कुमारनंतर ‘या’ अभिनेत्याचाही हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 17:52 IST2017-08-01T12:22:32+5:302017-08-01T17:52:32+5:30
काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. आता कन्नड अभिनेता ध्रुव शर्मा याचादेखील ...

इंदर कुमारनंतर ‘या’ अभिनेत्याचाही हृदयविकाराने मृत्यू
क ही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता इंदर कुमार याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. आता कन्नड अभिनेता ध्रुव शर्मा याचादेखील हृदयविकाराने मृत्यूची झाल्याची बातमी समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. होय, मंगळवारी (दि.२) अभिनेता धु्रव शर्मा याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्याच्या इतर अवयवांनी काम करणे बंद केले.
सूत्रानुसार, धु्रव कुठल्याही आजाराने ग्रस्त नव्हता. मात्र शनिवारी घरी असताना तो अचानकच जमिनीवर पडला. त्यानंतर त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तातडीने उपचारही करण्यात आले. मात्र याचदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. ३५ वर्षीय धु्रवच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुली आहेत. २८ जुलै रोजी अभिनेता इंदर कुमारचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. दरम्यान ध्रुवच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी ट्विट करून दु:ख व्यक्त केले आहे.
![]()
जेव्हा ध्रुवच्या निधनाची बातमी समोर आली तेव्हा साउथमधील अनेक बड्या स्टार्सनी ट्विट करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली. प्रियमणी, रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, विक्रांत संतोष, हंसिका पुनाचा, सुमालता, अंबरिश आदींनी ट्विट केले. ध्रुव शर्मा अभिनयाबरोबरच कर्नाटक क्रिकेट टीम ‘कर्नाटका बुलडोजर्स’चा सदस्य होता. त्याला अॅग्रेसिव्ह बॅटिंग स्टाइलसाठी ओळखले जात होते. धु्रवने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे वलय निर्माण केले होते.
धु्रवने ‘स्नेहांजली’, ‘बेंगलुरू ५६००२३’, ‘निनाद्रे इश्ता कानो’, ‘टिप्पाजी सर्किल’ आदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दरम्यान, धु्रवच्या निधनाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या चाहत्यांकडून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.