'गदर २'नंतर सनी देओलला लागली लॉटरी, एक नाही तर झळकणार ६ चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 03:47 PM2023-10-18T15:47:16+5:302023-10-18T15:47:43+5:30

Sunny Deol : अभिनेता सनी देओलचे फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. आता सनीने चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली आहे. गदर २च्या यशानंतर त्याच्याकडे आणखी मोठ्या ६ चित्रपटांच्या ऑफर्स आहेत.

After 'Gadar 2', Sunny Deol got the lottery, not one but 6 films | 'गदर २'नंतर सनी देओलला लागली लॉटरी, एक नाही तर झळकणार ६ चित्रपटात

'गदर २'नंतर सनी देओलला लागली लॉटरी, एक नाही तर झळकणार ६ चित्रपटात

बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) सध्या त्याच्या गदर २ (Gadar 2)  चित्रपटाचे यश साजरे करत आहे. २२ वर्षांपूर्वी गदर चित्रपट आला होता. तेव्हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप धुमाकूळ घातला होता. आता गदर २नेदेखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. गदरप्रमाणेच सीक्वललादेखील प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. ११ ऑगस्ट, २०२३ ला रिलीज झालेला गदर २ आताही काही थिएटरमध्ये आहे. ६०० कोटींहून जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने सनी देओलचं नशीब फळफळलं आहे. अशी बातमी आहे की, सनी देओलकडे ६ चित्रपटांच्या ऑफर आहेत. यात २ सीक्वलचा समावेश आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'गदर २'च्या यशानंतर सनी देओलच्या हातात आणखी ६ चित्रपट आहेत. सनी लवकरच 'लाहोर १९४७' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर सनी'बाप' चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. जो पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. याशिवाय तो अयोध्या रामजन्मभूमीवर आधारीत चित्रपटातही दिसणार आहे.

यासोबतच सनी देओल बॉलिवूडच्या दोन यशस्वी चित्रपटांच्या सिक्वेलमध्येही दिसणार आहे, ज्यात 'बॉर्डर २' आणि 'मां तुझे सलाम २' या चित्रपटांची नावे आहेत. याशिवाय तो 'जोसेफ' चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. या ६ चित्रपटांव्यतिरिक्त सनी देओल मराठी चित्रपटांमध्येही काम करणार असल्याची बातमी आहे.

Web Title: After 'Gadar 2', Sunny Deol got the lottery, not one but 6 films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.