दीपवीरनंतर बॉलिवूडमधील 'हा' प्रसिद्ध अभिनेता चढणार बोहल्यावर, बालपणीची मैत्रिणीसोबत घेणार सप्तपदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 14:12 IST2019-01-05T13:53:48+5:302019-01-05T14:12:05+5:30
2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लगीनसराईचे ठरले सोनम कपूर- आनंद अहुजा, प्रियांका चोप्रा- निक जोनास आणि दीपिका पादुकोण- रणवीर सिंग हे सेलिब्रेटी या गतवर्षी लग्नाच्या बेडीत अडकले.

दीपवीरनंतर बॉलिवूडमधील 'हा' प्रसिद्ध अभिनेता चढणार बोहल्यावर, बालपणीची मैत्रिणीसोबत घेणार सप्तपदी
2018 हे वर्ष बॉलिवूडसाठी लगीनसराईचे ठरले सोनम कपूर- आनंद अहुजा, प्रियांका चोप्रा- निक जोनास आणि दीपिका पादुकोण- रणवीर सिंग हे सेलिब्रेटी या गतवर्षी लग्नाच्या बेडीत अडकले. यावर्षी कोणत्या सेलिब्रेटींच्या घरी लग्नाचे सनई-चौघडे वाजणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.
या लिस्टमध्ये सगळ्यात पहिलं नावं येतेय वरूण धवनचं. वरुण धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत लग्नाच्या बंधनात यावर्षी अडकणार असल्याचे कळते.रिपोर्टनुसार वरुण नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहे. वरूण व नताशा या दोघांच्या नात्यावर दोन्ही कुटुंबांनीही पसंतीची मोहोर लावली आहे आणि दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. वरुण कडून अजून याबाबत कोणतेच अधिकृत वक्तव्य आलेले नाही मात्र लवकरच तो आपल्या लग्नाची तारीख चाहत्यांसोबत शेअऱ करण्याची शक्यता आहे. नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. वरूण व नताशा अनेकदा एकत्र दिसले आहेत. वरुणच्या घरच्या सगळ्या इव्हेंटला नताशा व तिचे कुटुंब हजर असते. मात्र दोघांनी आपलं नातं कधीच स्वीकारले नव्हते.
वरुणच्या प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर तो 'कलंक'मध्ये तो आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर , सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, संजय दत्त आणि माधुरी दीक्षितबरोबर दिसणार आहे. अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.