सततच्या फ्लॉप सिनेमांनंतर आता अक्षय कुमार वळला दक्षिणात्य इंडस्ट्रीकडे, झळकणार प्रभाससोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 07:08 PM2024-04-08T19:08:25+5:302024-04-08T19:08:56+5:30

Akshay Kumar : अक्षय कुमार लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटात दिसणार आहे.

After continuous flops, Akshay Kumar has now turned to the southern industry, starring alongside Prabhas | सततच्या फ्लॉप सिनेमांनंतर आता अक्षय कुमार वळला दक्षिणात्य इंडस्ट्रीकडे, झळकणार प्रभाससोबत

सततच्या फ्लॉप सिनेमांनंतर आता अक्षय कुमार वळला दक्षिणात्य इंडस्ट्रीकडे, झळकणार प्रभाससोबत

बॉलिवूडमध्ये अनेक मोठे स्टार्स आहेत जे साऊथ चित्रपटांकडे वळत आहेत. अनेक चित्रपट निर्मात्यांनी बॉलिवूड सुपरस्टार्सच्या सहकार्याने ब्लॉकबस्टर चित्रपट देखील दिले आहेत. मग तो शाहरुख खान असो वा रणबीर कपूर. अक्षय कुमार(Akshay Kumar)नेही या दोन सुपरस्टारच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभासच्या चित्रपटात दिसणार आहे. अक्षय कुमार आणि प्रभास कन्नप्पा या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. कन्नप्पा हा अभिनेता-निर्माता मंचू विष्णूच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे.

कन्नप्पा हा एक पौराणिक महाकाव्यावर आधारित चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय कुमार लवकरच बडे मियाँ छोटे मियाँनंतर कन्नप्पाच्या प्रोडक्शनमध्ये सहभागी होण्यास तयार आहे. कन्नप्पाच्या स्टार कास्टमध्ये प्रभास, मोहन बाबू, मोहनलाल, शिवा राजकुमार, नयनतारा आणि मधुबाला यांचा समावेश आहे. कन्नप्पा या चित्रपटात एका शिवभक्ताची कथा पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची पटकथा परचुरी गोपाला कृष्णा, थोटा प्रसाद, साईनाथ थोतापली आणि साई माधव बुरा यांनी लिहिली आहे. या चित्रपटात साऊथ स्टार विष्णू मंचू कन्नप्पाच्या भूमिकेत असून प्रभास भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'बडे मियाँ छोटे मियाँ'बद्दल...

अक्षय कुमारच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाविषयी सांगायचे तर, या चित्रपटात टायगर श्रॉफ पहिल्यांदाच त्याच्यासोबत दिसणार आहे. बडे मियाँ छोटे मियाँ हा बिग बजेट चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे, ज्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे आणि अक्षय कुमार, पृथ्वीराज सुकुमारन, टायगर श्रॉफ, मानुषी छिल्लर, अलाया एफ आणि सोनाक्षी सिन्हा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर सेलिब्रिटी आणि चाहत्यांना खूप आवडला आहे.

Web Title: After continuous flops, Akshay Kumar has now turned to the southern industry, starring alongside Prabhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.