ब्रेकअपनंतर कॅटरिना रणबीर कपूरचा पहिला सेल्फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2017 15:19 IST2017-04-28T09:49:52+5:302017-04-28T15:19:52+5:30
रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर 'जग्गा जासूस' हा चित्रपट 14 जुलैला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात रणबीर कपूर आणि ...

ब्रेकअपनंतर कॅटरिना रणबीर कपूरचा पहिला सेल्फी
र बीर कपूर आणि कॅटरिना कैफ स्टारर 'जग्गा जासूस' हा चित्रपट 14 जुलैला प्रदर्शित होतोय. या चित्रपटात रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांच्या ब्रेकअपनंतर हा चित्रपट मध्येच अडकायची शक्यता होती. मात्र निर्माता आणि दिग्दर्शक यांच्या अपेक्षांवर खरे उतरत दोघांनी या चित्रपटाचे शूटिंग वेळेत पूर्ण केले. या चित्रपटात रणबीर, कतरिनासह गोविंदा, सायानी गुप्ता आणि अदा शर्मासुद्धा दिसणार आहेत.
एक तरुण डिटेक्टिव्ह जो आपल्या हरवलेल्या वडिलांच्या शोधात असतो याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. नुकताच या चित्रपटाच्या सेटवरचा फोटो सयानीने शेअर केला आहे. ज्या फोटोत बघून अंदाज बांधता येतो की ब्रेकअपनंतर ही रणबीर आणि कॅटरिना सेटवर चांगला वेळ एकत्र घालवत होते. दोघांच्या ब्रेकअपनंतरचा हा पहिलाच सेल्फी आहे. मागे एका पोस्टरवरुन कॅटरिना अनुरागवर प्रचंड नाराज झाली होती. जग्गा जासूसच्या एक पोस्टरवर रणबीर कॅटरिनाला किस करताना दाखवण्यात आले होते. यानंतर कॅटरिना दिग्दर्शकावर नाराज झाली होती.
'जग्गा जासूस' हा अनुराग बासू दिग्दर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात सयानी गुप्ता एका छोट्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात तब्बल 29 गाणी आहेत. रणबीर आणि कॅटरिनाची जोडी प्रेक्षकांना याआधी अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच ते स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे दोघांचे हे फॅन्स त्यांची ब्रेकअपनंतरची केमिस्ट्री पाहण्यास उत्सुक आहेत.