कॅन्सरवर मात केल्यानंतर आता हा अभिनेता काम करण्यासाठी झाला सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 19:43 IST2019-10-03T19:42:45+5:302019-10-03T19:43:20+5:30
यावर्षी जानेवारीत या अभिनेत्याला थ्रोट कॅन्सर असल्याचं समजलं होतं.

कॅन्सरवर मात केल्यानंतर आता हा अभिनेता काम करण्यासाठी झाला सज्ज
बॉलिवूडचा क्रिश म्हणजेच अभिनेता हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन क्रिश ४ चित्रपटाच्या कामात खूप बिझी होते जेव्हा त्यांना कर्करोग झाल्याचं समजलं. राकेश रोशन यांच्या गळ्यात Squamous Cell Carcinomaची तक्रार होती. त्यांना कर्करोगाची नुकतीच सुरूवात झाली असली तरी त्यांच्या तब्येतीवर परिणाम होत होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रोजेक्ट्सचं काम थांबवावं लागलं. त्यामुळे त्यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या प्रदर्शन पुढे ढकललं.
यावर्षाच्या सुरूवातीला राकेश रोशन यांनी कॅन्सरची सर्जरी केली. सर्जरी यशस्वी झाल्यानंतर ते आरामासाठी ब्रेकवर होते. मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राकेश रोशन यांनी क्रिश ४ चित्रपटाच्या स्क्रीप्टवर पुन्हा काम सुरू केले आहे.
नुकतेच हृतिक रोशनने सांगितलं होतं की, त्याच्या वडिलांची तब्येत सुधारते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राकेश रोशन आता नॉर्मल रुटिनवर येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या स्क्रीप्टवर काम करण्यासाठी ते खूप साऱ्या क्रिएटिव्ह लोकांच्या टीमसोबत काम करणार आहेत. असं बोललं जातंय की, क्रिश ४ चित्रपटाच्या शूटिंगला २०२०मध्ये सुरूवात होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय गुप्ता करणार आहेत. संजय गुप्ता यांनी यापूर्वी हृतिक रोशनचा चित्रपट काबिलचं दिग्दर्शन केलं होतं.
सूत्रांच्या माहितीनुसार क्रिश ४ चित्रपट आधीच्या फ्रेंचाईजीपेक्षा जास्त दमदार असणार आहे. क्रिश ४मध्ये स्ट्रगल आणि खलनायक जास्त पहायला मिळणार आहे.