१६ वर्षांनी दर्शील-आमिर पुन्हा एकत्र, 'तारे जमीन पर' नंतर पुन्हा नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 03:31 PM2024-03-05T15:31:56+5:302024-03-05T15:34:01+5:30

'तारे जमीन पर' मधली गुरु शिष्याची जोडी अर्थात आमिर - दर्शिल पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.

After 16 years, Darsheel safary Aamir Khan reunited in new movie | १६ वर्षांनी दर्शील-आमिर पुन्हा एकत्र, 'तारे जमीन पर' नंतर पुन्हा नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र

१६ वर्षांनी दर्शील-आमिर पुन्हा एकत्र, 'तारे जमीन पर' नंतर पुन्हा नवीन प्रोजेक्टमध्ये एकत्र

'तारे जमीन पर' सिनेमा सर्वांना आठवत असेलच. २००७ साली आलेल्या 'तारे जमीन पर' सिनेमात आमिर खान आणि बालकलाकार दर्शिल सफारी यांना चांगलीच पसंती मिळाली. आमिर - दर्शिल या गुरुशिष्याची कहाणी सर्वांना भावूक करुन गेली. प्रेक्षकांची हीच लाडकी जोडी तब्बल १६ वर्षांनी पुन्हा एकदा ऑन कॅमेरा एकत्र येत आहे. दर्शिलने पोस्ट करुन ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली.

 इंस्टाग्राम हँडलवर दर्शील सफारीने एक कोलाज शेअर केला आणि लिहिले, “BOOOMMMMM! 16 वर्षांनंतर, आणि आम्ही पुन्हा भावूक आहोत? होय, थोडेसे. उत्साही आहोत? अगदी. माझ्या आवडत्या मार्गदर्शकाला सर्व प्रेम. मोठ्या घोषणेसाठी वाट पहा. 4 दिवस बाकी आहेत!!!”. दर्शिलने शेअर केलेल्या फोटोमध्ये 'तारे जमीन पर' चित्रपटातील एक दृश्य पाहू शकतो ज्यामध्ये आमिर खान आणि एक छोटा दर्शील आहे. पुढच्या फोटोत आमिर एका म्हाताऱ्याच्या रुपात तर दर्शील तरुणाच्या रुपात दिसत आहे. काही वेळातच हा फोटो व्हायरल झाला.

अनेकांना हा फोटो 'सितारे जमीन पर' सिनेमाच्या शुटींगचा वाटतोय. आमिरच्या आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमाचं शुटींग गेल्या महिन्यात फेब्रुवारीपासून बॅक-टू-बॅक  सुरू आहे. 'सितारे जमीन पर' या चित्रपटात जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहे. जेनेलिया आणि आमिरचा हा पहिलाच चित्रपट आहे. या सिनेमात जर दर्शिल असेल तर सर्वांना सुखद धक्का बसेल यात शंका नाही.

Web Title: After 16 years, Darsheel safary Aamir Khan reunited in new movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.