प्रमोशनसाठी आदित्यने काढला त्याचा शर्ट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2017 19:04 IST2017-01-07T19:04:36+5:302017-01-07T19:04:36+5:30

चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी कलाकार काहीही करू शकतो इथपर्यंत ठीक आहे. पण, चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही कलाकार काहीही करू शकतात, यावर विश्वास ...

Aditya shot his shirt for promotion? | प्रमोशनसाठी आदित्यने काढला त्याचा शर्ट?

प्रमोशनसाठी आदित्यने काढला त्याचा शर्ट?

ंगल्या भूमिका मिळवण्यासाठी कलाकार काहीही करू शकतो इथपर्यंत ठीक आहे. पण, चित्रपटाच्या प्रमोशनसाठीही कलाकार काहीही करू शकतात, यावर विश्वास बसत नाही. पण, अलीकडेच ‘ओके जानू’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आदित्य रॉय कपूर आणि सलमान खान यांनी त्यांचे शर्ट काढलेले फोटो भाईजानच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. या फोटोला आदित्यने कॅप्शन दिली की,‘फोटो क्लिक करण्यासाठी एका खानला फसवले. भाई मी हा फोटो ट्विटरवर पोस्ट केलाय.’ या फोटोत ते दोघे आरशामध्ये स्वत:ला पाहताना दिसत आहेत. जसं त्याने भाईला फसवलं तसंच तो आता शाहरूख, आमिर, हृतिक, अजय आणि अक्षय यांनाही याचपद्धतीने फसवणार आहे. शाद अली दिग्दर्शित ‘ओके जानू’ चित्रपटात श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘ओके जानू’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व गाणी रिलीज करण्यात आली असून त्याना चाहत्यांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. ‘आशिकी २’ या चित्रपटात झळलेली आदित्य व श्रद्धाची जोडी आगामी ओके जानू या चित्रपटात पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या विषयावर आधारीत असलेल्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली आहे.

{{{{twitter_post_id####}}}}






 

Web Title: Aditya shot his shirt for promotion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.