आदित्य रॉय कपूर आणि सारा खानचा मुंबई मेट्रोतून प्रवास, चाहती सेल्फी काढायला आली अन्...; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 11:03 IST2025-07-01T11:01:32+5:302025-07-01T11:03:24+5:30
आदित्य आणि सारा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. 'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक इव्हेंटमध्येही सहभागी होत आहेत. नुकतंच त्या दोघांनी मेट्रोतूनही प्रवास केला.

आदित्य रॉय कपूर आणि सारा खानचा मुंबई मेट्रोतून प्रवास, चाहती सेल्फी काढायला आली अन्...; पाहा व्हिडीओ
आदित्य रॉय कपूर आणि सारा अली खान 'मेट्रो इन दिनो' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे आदित्य आणि सारा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. 'मेट्रो इन दिनो' सिनेमाच्या निमित्ताने ते अनेक इव्हेंटमध्येही सहभागी होत आहेत. नुकतंच त्या दोघांनी मेट्रोतूनही प्रवास केला.
'मेट्रो इन दिनो' सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून आदित्य आणि साराने मुंबईतील मेट्रोमधून प्रवास केला. आदित्य आणि साराला मुंबई मेट्रोमध्ये पाहून मुंबईकर आश्चर्यचकित झाले. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत आदित्य आणि सारा मेट्रो प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहेत. तर चाहते त्यांच्याबरोबर सेल्फी काढत असल्याचंही दिसत आहे.
अनुराग बासूचा 'मेट्रो इन दिनो' सिनेमा येत्या ४ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आदित्य कपूर, सारा खान, नीना गुप्ता, अनुपम खेर, अली फजल, फातिमा शेख अशी स्टारकास्ट आहे. 'लाइफ इन मेट्रो' या सिनेमाचा हा सीक्वल असल्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.