Aditya Pancholi: अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा वादात; शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 02:52 PM2022-02-09T14:52:44+5:302022-02-09T14:53:53+5:30

Aditya Pancholi News: चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिसने आदित्य पांचोलीवर दारुच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप लावला आहे.

Aditya Pancholi | Actor Aditya Pancholi again in controversy; complaint of abuse, threats and assault Filed against him | Aditya Pancholi: अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा वादात; शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल

Aditya Pancholi: अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा वादात; शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल

googlenewsNext

मुंबई: चित्रपट अभिनेता आदित्य पांचोली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. एका चित्रपट निर्मात्याने आदित्य पांचोलीवर शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आदित्य पांचोली आणि चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिस यांनी मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात क्रॉस तक्रार नोंदवली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

आदित्य पांचोली नशेत होता - सॅम फर्नांडिस

सॅम फर्नांडिस यांचा आरोप आहे की, त्यांना आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजसोबत चित्रपट बनवायचा होता, पण त्यांच्या चित्रपटासाठी कोणीही आर्थिक मदत करण्यास तयार नव्हते. जेव्हा कोणताही निर्माता चित्रपट बनवण्यास तयार नव्हता तेव्हा सॅमने आदित्य पांचोलीला ही गोष्ट सांगितली. त्यानंतर 27 जानेवारी रोजी आदित्य पांचोलीने चित्रपट निर्माता सॅमला जुहू येथील सन अँड सन हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले.

सॅम हॉलेटमध्ये आल्यानंतर आदित्य पांचोलीने सॅमला धमकी दिली. 'तुला माझ्या मुलासोबत चित्रपट बनवावा लागेल, नाहीतर मी तुला संपवून टाकेन', अशी धमकी दिल्याचा आरोप सॅम यांनी केला. तसेच, आदित्य पांचोलींनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचेही सॅम फर्नांडिस यांनी सांगितले. ही घटना घडली त्यावेळी आदित्य पांचोली दारूच्या नशेत होते, अशी माहिती सॅमने दिली आहे. मुंबई पोलिस डीसीपी मंजुनाथ सिंगे म्हणाले की, या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून क्रॉस एनसी नोंदवून तपास सुरू आहे. आदित्य पांचोलीने या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. 

 

Web Title: Aditya Pancholi | Actor Aditya Pancholi again in controversy; complaint of abuse, threats and assault Filed against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.