आई तू बाबा मी होणार गं...! आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी हलणार पाळणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:55 PM2022-01-24T12:55:19+5:302022-01-24T12:58:26+5:30

टेलिव्हिजनचा पॉप्युलर होस्ट व सिंगर Aditya Narayan लवकरच बाबा होणार आहे. आदित्यने स्वत: ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

aditya narayan and his wife shweta agarwal to welcome their first baby soon | आई तू बाबा मी होणार गं...! आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी हलणार पाळणा

आई तू बाबा मी होणार गं...! आदित्य नारायण-श्वेता अग्रवालच्या घरी हलणार पाळणा

googlenewsNext

टेलिव्हिजनचा पॉप्युलर होस्ट व सिंगर आदित्य नारायण (Aditya Narayan ) लवकरच बाबा होणार आहे. होय, आदित्यची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) प्रेग्नंट आहे. आदित्यने स्वत: ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आदित्यने  इन्स्टाग्रामवर श्वेतासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात श्वेता बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसतेय. ‘मी आणि श्वेता लवकरच आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत..,’ असं आदित्यने  या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अलीकडे एका मुलाखतीत आदित्यने पत्नीच्या प्रेग्नंसीचा खुलासा केला होता. मुलगी हवी की मुलगा असं विचारलं असता, मुलगी झाली तर मला अधिक आनंद होईल. कारण मुली बाबाच्या खूप क्लोज असतात, असं आदित्य म्हणाला होता.

1 डिसेंबर 2020 रोजी आदित्य व श्वेता विवाहबंधनात अडकले होते. आदित्य व श्वेताची पहिली भेट 2010 मध्ये ‘शापित’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि नंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाआधी 10 वर्ष दोघंही एकमेकांना डेट करत होते. मात्र जगापासून दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती.

श्वेताने करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली आहे. श्वेता 2000 मध्ये टीव्ही सीरियल ‘बाबुल की दुल्हनिया’ मध्ये दिसली होती.यानंतर श्वेता 2001 मध्ये  शगुन आणि 2004 मध्ये  देखा मगर प्यार से या मालिकेमध्ये मध्ये दिसली होती. श्वेताने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून फिल्मी जगात पाऊल ठेवलं. श्वेता शेवटची 2010मध्ये आलेला बॉलिवूड सिनेमा ‘शापित’मध्ये आदित्य नारायणसोबत शेवटची दिसली होती. हा एक हॉरर सिनेमा होता.
 

Web Title: aditya narayan and his wife shweta agarwal to welcome their first baby soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.