आदित्य होस्ट करणार टीव्ही शो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 16:45 IST2016-07-13T11:15:44+5:302016-07-13T16:45:44+5:30
बॉलिवूडचा हॉट हंक आदित्य रॉय कपूर लवकरच एक ट्रव्हलिंग शो होस्ट करताना आपल्याला दिसणार आहे. होय, वाचतायं ते खरं ...
.jpg)
आदित्य होस्ट करणार टीव्ही शो!!
ब लिवूडचा हॉट हंक आदित्य रॉय कपूर लवकरच एक ट्रव्हलिंग शो होस्ट करताना आपल्याला दिसणार आहे. होय, वाचतायं ते खरं आहे. एका आघाडीच्या चॅनलने आदित्यला एका अॅडव्हेंचर बाईकींग शोची आॅफर दिली आहे. आदित्य किती बाईक वेडा आहे, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. अनेक मुव्ही स्क्रिनिंग वा पार्टीला आदित्य बाईकवरूनच येतो. बाईकवर भटकण्याचे जणू त्याला वेडच आहे. गतवर्षी आदित्यने स्वत:साठी एक महागडी बाईक खरेदी केली होती. त्याच्याजवळ अनेक बाईकचे कलेक्शनही आहे. या बाईकची काळजी आदित्य स्वत: घेतो. त्यामुळेच संबंधित शोच्या निर्मात्यांना आदित्य या शोसाठी अगदी परफेक्ट वाटला. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आदित्यला बाईक राईड आवडते. त्यामुळे या अॅडव्हेंचरस ट्रिप शोसाठी तो अगदी योग्य आहे. या शोमध्ये आदित्य बाईकने एका ट्रिपवर निघेल. ट्रिपचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य त्याला असेल. याशिवाय या शोमध्ये भाग घेऊ इच्छिणारेही एका ट्रिपला निघतील. या ट्रिपमधील अनुभव, वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी शोमध्ये दाखवल्या जातील. हा शो लोकप्रीय होईल, अशी निर्मात्यांना आशा आहे. असणारच, कारण आदित्यचे फॅन फॉलोर्इंग मोठे आहे. विशेषत: मुलींमध्ये आदित्य तुफान लोकप्रीय आहे. त्याची हीच लोकप्रीयता निर्मात्यांना कॅश करायची आहे...काय कळले ना!!