अचानक गायब झाल्यात या बोल्ड बाला! यांच्या बोल्डनेसपुढे फेल होत्या मोठमोठ्या सिनेनट्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:02 PM2020-05-11T16:02:21+5:302020-05-11T16:54:57+5:30

एकेकाळी या अभिनेत्रींची प्रचंड क्रेज होती. पण आज यापैकी अनेकजणी ग्लॅमर सोडून आयुष्य जगत आहेत. 

actresses who did bold role dissappeared from bollywood-ram | अचानक गायब झाल्यात या बोल्ड बाला! यांच्या बोल्डनेसपुढे फेल होत्या मोठमोठ्या सिनेनट्या!!

अचानक गायब झाल्यात या बोल्ड बाला! यांच्या बोल्डनेसपुढे फेल होत्या मोठमोठ्या सिनेनट्या!!

googlenewsNext
ठळक मुद्दे८० आणि ९० च्या दशकातील सेक्सी अभिनेत्रींमध्ये किमी काटकर हिचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. 

होय, यांच्या बोल्डनेसपुढे सगळ्यात अभिनेत्री पडल्या होत्या फिक्या, आज त्याच झाल्यात बॉलिवूडमधून गायब. एकेकाळी या अभिनेत्रींची प्रचंड क्रेज होती. पण आज यापैकी अनेकजणी ग्लॅमर सोडून आयुष्य जगत आहेत. अशात काही अभिनेत्रींबद्दल...

उदिता गोस्वामी

पाप या चित्रपटापासून फिल्मी करिअर सुरु करणारी उदिता संसारात रमली आहे. 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी उदिता पुढे अक्सर आणि जहर या सिनेमातही दिसली. पण बॉलिवूडमध्ये फार लांबचा पल्ला तिला गाठता आला नाही. 12 वर्षांच्या करिअरमध्ये तिने केवळ 12 सिनेमे केलेत. मोहित सूरीसोबत संसार थाटल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला तो कायमचाच.

अंतरा माळी

अंतरा माळी 1998 साली ‘ढुंढते रह जाओगे’ या सिनेमात रेणूच्या भूमिकेत पहिल्यांदा झळकली. अंतरानेही 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये केवळ 12 चित्रपटांत काम केले.
2010 मध्ये आलेल्या ‘अ‍ॅण्ड वन्स अगेन’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपट किंवा टीव्ही शोमध्ये दिसली नाही. 

किम शर्मा

क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच्या अफेअरमुळेच किम शर्मा अधिक चर्चेत राहिली. सुपरहिट सिनेमा ‘डर’मध्ये किम अगदी छोट्याशा भूमिकेत झळकली होती. यानंतर सात वर्षांनी ‘मोहब्बतें’मध्ये ती सपोर्टिंग रोलमध्ये दिसली. पण तिचे फिल्मी करिअर फार चालले नाही. आजकाल केवळ बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्येच ती दिसते.

 जॅस्मिन

‘वीराना’ या हॉरर सिनेमात जॅस्मिन झळकली. यानंतर बंद दरवाजा, डाक बंगला, पुरानी हवेली अशा अनेक हॉरर सिनेमात ती दिसली. पण यानंतर ती कुठे गायब झाली कळलेच नाही. असे म्हणतात की, अंडरवर्ल्ड डॉन तिच्या सौंदर्यावर भाळला होता. अंडरवर्ल्डच्या फोनमुळे ती इतकी त्रासली की,  भारत सोडून ती कायमची गायब झाली.

सोनू वालिया

सोनू वालिया बोल्ड इमेजसाठी ओळखली गेली. तिच्या बोल्ड अदांवर प्रेक्षक असे काही फिदा होते की, चित्रपटगृहांबाहेर लोकांच्या रांगा लागायच्या. ‘खून भरी मांग’ चित्रपटातील भुमिकेमुळे ती आजही लोकांच्या लक्षात आहे. पण बॉलिवूडमधून मात्र ती कधीच गायब झाली.

सोनम

ओये...ओये... या गाण्यामुळे लोकप्रिय झालेली सोनम आज विदेशात राहते. दिग्दर्शक राजीव राव यांच्याशी लग्न करून सोनम विदेशात स्थायिक झाली. सोनम एकेकाळची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाई.

ममता कुलकर्णी

90 च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वाधिक हॉट अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीला ओळखले जाई. पण अचानक ती बॉलिवूडमधून गायब झाली. पुढे संन्यासी बनली, ड्रग्ज रॅकेटमध्येही तिचे नाव आले. यानंतर  ममता कुलकर्णी बॉलिवूडकडे पुन्हा फिरकलीच नाही.

किमी काटकर 

80 आणि 90 च्या दशकातील सेक्सी अभिनेत्रींमध्ये किमी काटकर हिचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. करिअर ऐन भरात असताना किमीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. फोटोग्राफर आणि अ‍ॅड फिल्ममेकर शंतनू शोरे याच्यासोबत लग्न केल्यानंतर तिने बॉलिवूडमधून संन्यास घेतला. 

मोनिका बेदी 

 मोनिका बेदीचे फिल्मी करिअर तेवढे खास नव्हते. म्हणजे लक्षात राहण्याइतके तर मुळीच नाही. फिल्मी करिअरपेक्षा   गँगस्टर अबू सालेमसोबत असलेल्या प्रेम प्रकरणामुळे तिच्या नावाची अधिक चर्चा झाली. मोनिकाने मध्यंतरी  टीव्हीच्या माध्यमातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसमध्येही ती झळकली होती. पण बॉलिवूडपासून चार हात लांबच आहे.
 
अनिता राज 

अनिता राजने एकेकाळी बॉलिवूड गाजवले. 80  आणि 90 च्या दशकात  जवळपास सर्व दिग्गज अभिनेत्यांसोबत तिने काम केले. पण यानंतर तिच्या करिअरला ओहोटी लागली. पुढे ती बॉलिवूडमधून गायब झाली ती झालीच.

Web Title: actresses who did bold role dissappeared from bollywood-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.