​अभिनेत्रींचा साउथ ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 17:54 IST2018-03-23T12:24:52+5:302018-03-23T17:54:52+5:30

-रवींद्र मोरे  बॉलिवूड चित्रपट सृष्टी, साउथच्या तुलनेने खूपच मोठी आहे. मात्र साउथचे चित्रपटही सध्या बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत आहेत. ...

Actresses to travel from South to Bollywood are inspirational! | ​अभिनेत्रींचा साउथ ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी !

​अभिनेत्रींचा साउथ ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी !

ong>-रवींद्र मोरे 
बॉलिवूड चित्रपट सृष्टी, साउथच्या तुलनेने खूपच मोठी आहे. मात्र साउथचे चित्रपटही सध्या बॉलिवूड चित्रपटांना टक्कर देत आहेत. बॉलिवूड जरी साउथ चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असेल, मात्र साउथच्या बऱ्याच कलाकरांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सुपरहिट चित्रपट दिले आहेत. विशेष म्हणजे अभिनेतेच नव्हे तर काही अभिनेत्रींनी साउथ चित्रपटांत करिअरची सुरुवात केली आहे आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आपली नवी ओळख निर्माण केली. जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबाबत ज्यांचा साउथ ते बॉलिवूड पर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे.  

Image result for hema malini

* हेमा मालिनी 
बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनी अम्मनकुट्टी, तामिळनाडूच्या चक्रवर्ती कुटुंबाशी संबंधीत आहे. हेमा मालिनीने अ‍ॅक्टिंग डेब्यू १९६३ मध्ये तमिळ चित्रपट ‘इधु सथियम’ पासून केला होता. या चित्रपटात हेमा सपोर्टिंग अ‍ॅक्टरच्या रोलमध्ये होती. हेमा यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात लीजेंड अ‍ॅक्टर राज कपूरचा चित्रपट ‘सपनो का सौदागर’ पासून केली होती. त्यानंतर हेमा यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला देऊ न आपले स्थान अधोरेखित केले.  

Image result for rekha

* रेखा  
बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचे वडिल जॅमिनी गणेशन आणि त्यांची आई पुष्पवल्ली तमिळ चित्रपटात अ‍ॅक्टर्स होते. रेखा यांनी आतापर्यंत १८० पेक्षा जास्त चित्रपट दिले आहेत आणि त्यांनी आपल्या आयुष्याचे ४० वर्ष अभिनय क्षेत्रात व्यतित केले आहेत. रेखाने आपल्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपट ‘गोवा डल्ली सीआयडी ९९९’ पासून केली होती. त्यानंतर बॉलिवूड डेब्यू वयाच्या १६ व्या वर्षी ‘दो शिकारी’ चित्रपटातून केली होती. रेखा आज बॉलिवूडच्या सर्वात महानतम अ‍ॅक्ट्रेसेसमधल्या एक मानल्या जातात.  

 Image result for aish

* ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चनच्या सौंदर्याचे आजही असंख्य चाहते आहेत. ऐश्वर्याचा जन्म एक पारंपरिक साउथ इंडियन फॅमिलीमध्ये झाला होता. ऐशने आपला अ‍ॅक्टिंग डेब्यू तमिळ चित्रपट ‘इरुवर’ पासून १९९७ मध्ये केला होता. ऐशचा हा चित्रपट दर्शकांना खूपच आवडला होता. बॉलिवूडमध्ये आल्याने ऐशने देवदास, हम दिल दे चुके सनम आणि ताल यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले. 

Related image

 * विद्या बालन 
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने दबदबा निर्माण करणारी विद्या बालनने आपल्या करिअरची सुरुवात २००३ मध्ये बंगाली चित्रपट ‘भालो थेको’ पासून केली होती. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयामुळे विद्याला सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर विद्याने ‘परिणिता’ पासून ‘एक अलबेला’ पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Image result for deepika

* दीपिका पादुकोण
बॉलिवूडची टॉपची नायिका म्हणून प्रसिद्धीस आलेली दीपिका पादुकोणनेही आपल्या करिअरची सुरुवात २००६ मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून केली होती. दीपिकाने बॉलिवूडमध्ये पर्दापण करून ‘ओम शांती ओम’ पासून ते ‘पद्मावत’ पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट देत थेट हॉलिवूडपर्यंतही मजल मारली आहे. तिचा हा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे. 

Web Title: Actresses to travel from South to Bollywood are inspirational!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.