आजीसोबत जबरदस्त ठुमके लावताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; पाहा दोघींमधील जुगलबंदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 18:02 IST2018-03-25T12:32:08+5:302018-03-25T18:02:16+5:30

या अभिनेत्रीने चक्क आजीसोबत ठुमके लावले असून, तिचा व्हिडीओ सध्या वाºयासारखा व्हायरल होत आहे. दोघींचा हा व्हिडीओ तुफान पसंत केला जात आहे.

The actress, who was seen wearing a huge towel with her grandmother; See the duo between the duets! | आजीसोबत जबरदस्त ठुमके लावताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; पाहा दोघींमधील जुगलबंदी!

आजीसोबत जबरदस्त ठुमके लावताना दिसली ‘ही’ अभिनेत्री; पाहा दोघींमधील जुगलबंदी!

लिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे व्हिडीओ अपलोड करीत असतात. आता ‘१९२०’ आणि ‘कमांडो-२’मध्ये बघावयास मिळालेल्या अदा शर्मानेही असाच काहीसा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. व्हिडीओमध्ये अदा आपल्या नव्या पार्टनरसोबत जबरदस्त डान्स करताना बघावयास मिळत आहे. हा पार्टनर दुसरा-तिसरा कोणीही नसून तिची आजी आहे. अदाने आजी तुळसी सुंदर पुरीसोबत जबरदस्त ठुमके लावले आहेत. दोघींच्या अदा बघण्यासारख्या असून, हा व्हिडीओ सध्या तुफान पसंत केला जात आहे. अदाच्या डान्स मूव्ज मस्तीच्या मुडमधील आहेत, तर तिची आजी आपल्या साध्या अंदाजात डान्स करताना दिसत आहे. दोघीही डान्स करताना खूपच क्यूट दिसत आहेत. अदाचा हा व्हिडीओ केवळ चारच तासांत सहा लाखांपेक्षा अधिक वेळा बघण्यात आला आहे. 

अदाने हा व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आपल्या डान्स पार्टनरला टॅग करा, माझी डान्स पार्टनर आजी आहे. संडेची माझी प्रेरणा आहे. माझ्या आयुष्यातील सर्वांत सकारात्मक व्यक्ती आहे. अजिबातच सुस्त नाही. खूपच जबरदस्त, दिलखुलासा आणि मेहनती व्यक्तिमत्व आहे... आणि आता ती माझी शिक्षिकाही आहे. 
 

अदा शर्माने २००८ मध्ये ‘१९२०’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. अदाने ‘हम हैं राही कार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र तिचे हे चित्रपट फारसे चालले नाही. ती विद्युत जामवालसोबत ‘कमांडो-२’मध्येही बघावयास मिळाली होती. या चित्रपटाच्या तिच्या भूमिकेला चांगलेच पसंत करण्यात आले होते. 

Web Title: The actress, who was seen wearing a huge towel with her grandmother; See the duo between the duets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.