रणबीर कपूरबरोबर सिगारेट ओढणारी ‘ही’ अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत; व्हायरल झाला व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 17:11 IST2017-10-31T11:40:52+5:302017-10-31T17:11:01+5:30
रणबीर कपूरसोबत एका हॉटेलबाहेर सिगारेट ओढतानाचे माहिराचे जेव्हा फोटो व्हायरल झाले होते तेव्हा तिच्यावर चौफेर टीका झाली होती. आता पुन्हा एकदा माहिराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
.jpg)
रणबीर कपूरबरोबर सिगारेट ओढणारी ‘ही’ अभिनेत्री पुन्हा आली चर्चेत; व्हायरल झाला व्हिडीओ!
अ िनेता रणबीर कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान यांच्या जेव्हापासून एकत्र फोटो व्हायरल झाला तेव्हापासून माहिरा चर्चेत आहे. या दोघांचाही सिगारेट ओढतानाचा फोटो व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा माहिरा चर्चेत आली आहे. मात्र यावेळेस रणबीर कपूरमुळे नव्हे तर तिच्या काळा चष्मा डान्समुळे ती चर्चेत आली आहे. होय, कॅटरिना कैफच्या प्रसिद्ध ‘काळा चष्मा’ या गाण्यावर सेल्फी डान्स करतानाचा माहिराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये माहिरा कॅटचे कौतुक करताना सेल्फी डान्स करीत आहे.
‘काळा चष्मा’ गाण्यावर पाकिस्तानी अभिनेत्री डान्स करीत असल्याने माहिराचा हा व्हिडीओ इंटरनेटवर धूम उडवून देत आहे. व्हिडीओमध्ये माहिराला काळा चष्मा परिधान करून डान्स मुव्ज करताना दिसत आहे. माहिराने गाण्यावर खूप चांगले एक्स्प्रेशन्स दिले आहेत. सध्या माहिरा ‘वरना’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तिचा हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोज रिलीज होणार आहे. माहिराने बॉलिवूडमध्ये शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून एंट्री केली होती. चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड पसंत आली होती.
या अगोदरदेखील माहिराला सोशल मीडियावर लहान कपडे परिधान करण्यावरून आणि स्मोक करण्यावरून ट्रोल करण्यात आले होते. मात्र यावेळी बरेचसे भारतीय आणि पाकिस्तानी सेलिब्रेटी माहिराच्या सपोर्टमध्ये पुढे आले होते. रणबीर कपूरनेही तिला पाठिंबा दिला होता. जेव्हा रणबीर आणि माहिराचे लंडनमधील एका हॉटेलबाहेर सिगारेट ओढतानाचे फोटो समोर आले होते, तेव्हा तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा माहिरा चर्चेत आली आहे.