"प्यार किया तो डरना क्या?" श्रद्धा कपूर रोहन श्रेष्ठासोबत गेली डिनर डेटला, व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 16:32 IST2021-03-10T16:32:30+5:302021-03-10T16:32:54+5:30
Shraddha Kapoor With Rohan Shrestha Dinner Date: नुकतेच श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा प्रियांक शर्माचं लग्न मालदीव येथे पार पडलं. ज्यात श्रद्धाच्या कुटुंबियांसोबत रोहन सुद्धा दिसला होता.

"प्यार किया तो डरना क्या?" श्रद्धा कपूर रोहन श्रेष्ठासोबत गेली डिनर डेटला, व्हिडीओ आला समोर
गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये श्रद्धा कपूर तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. फोटोग्राफर रोहन श्रेष्ठाला श्रद्धा डेट करत असल्याचं बोललं जात आहे. पण याबाबत दोघांनीही कोणत्याही प्रकारची जाहीर कबुली अजूनतरी दिली नाही. पुन्हा एकदा दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शूटिंगधून वेळ मिळताच दोघेही एकमेकांना वेळ देताना दिसतात.
दरम्यान सोशल मीडियावर श्रद्धा आणि रोहनच्या डिनर डेटची चर्चा आहे. ज्याचे फोटो खूप व्हायरल होताना दिसत आहेत. रोहन आणि श्रद्धा डिनर डेटवरून घरी परतताना कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचे हे फोटो सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहेत.
नुकतेच श्रद्धाची मावशी पद्मिनी कोल्हापूरे यांचा मुलगा प्रियांक शर्माचं लग्न मालदीव येथे पार पडलं. ज्यात श्रद्धाच्या कुटुंबियांसोबत रोहन सुद्धा दिसला होता. याशिवाय मालदीवमध्ये श्रद्धाच्या बर्थडे सेलिब्रेशनच्या फोटो आणि व्हिडीओमध्येही रोहन दिसला होता.
तेव्हापासूनच या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं आहे.
श्रद्धा कपूर बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाशी विवाहबंधनात अडकणार आहे, अशी चर्चा आहे. यावर आता श्रद्धा कपूरकडून स्टेटमेंट आले आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, जास्त प्रोजेक्टमुळे ती लग्नाबद्दल विचार करत नाही आहे. ही केवळ अफवा आहे. मात्र, रोहन श्रेष्ठासोबत असलेल्या रिलेशनशीपबद्दल बोलण्यास तिने नकार दिला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, “सध्या या सर्व गोष्टींचा विचार करण्याची माझ्याकडे वेळ नाही. मला यावेळी फक्त चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायचं आहे. ही केवळ एक अफवा आहे.”
रोहन श्रेष्ठा हा भारतातले दिग्गज फोटोग्राफर राकेश श्रेष्ठा यांचा मुलगा असून त्याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सध्या रोहन श्रेष्ठा हेही फोटोग्राफी क्षेत्रातले एक मोठे नाव बनले आहे. रोहन आणि श्रद्धा एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत असून त्यांनी 2018 पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असे म्हटले जात आहे.