'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, आता ही बॉलिवूड सुंदरी घेणार जागा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:40 IST2025-05-21T13:40:18+5:302025-05-21T13:40:52+5:30

भारत-पाकिस्तान युद्धानंतर 'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीच्या जागी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिसणार असल्याची शक्यता आहे. कोण आहे ती?

actress shraddha kapoor replace Pakistani actress mawra hocane in Sanam Teri Kasam 2 | 'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, आता ही बॉलिवूड सुंदरी घेणार जागा?

'सनम तेरी कसम २'मधून पाकिस्तानी अभिनेत्रीचा पत्ता कट, आता ही बॉलिवूड सुंदरी घेणार जागा?

'सनम तेरी कसम' (sanam teri kasam) हा सिनेमा २०१६ मध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले होते. काही दिवसांपूर्वा हा सिनेमा री-रिलीज झाला. या सिनेमात हर्षवर्धन राणे (harshvardhan rane) आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकाने (mawra hocane) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू असून भारत-पाकिस्तान दरम्यान वाढलेल्या तणावामुळे मावरा होकेनला दुसऱ्या भागातून वगळण्यात आले आहे. यामुळे निर्मात्यांनी नवीन अभिनेत्रीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही अभिनेत्री घेणार मावरा होकेनची जागा

'सनम तेरी कसम २'मध्ये अलीकडेच मावरा होकेनच्या जागी आता श्रद्धा कपूरचे नाव पुढे आले आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सिनेमाचे दिग्दर्शक विनय सप्रू आणि राधिका राव यांनी मावरा होकेन 'सनम तेरी कसम २'मध्ये नसणार, या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. 'सनम तेरी कसम' सिनेमाचा मुख्य अभिनेता हर्षवर्धन राणेनेही भारताविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे मावरा होकेनसोबत काम करण्यास नकार दिला आहे.


या सर्व घडामोडींमुळे 'सनम तेरी कसम २' मध्ये श्रद्धा कपूरची एन्ट्री होण्याची शक्यता वाढली आहे. सिनेमाच्या निर्माते लवकरच नवीन कास्टची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान दरम्यान जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी मावरा होकेनने पाकिस्तानची बाजू घेऊन भारताविरोधी वक्तव्य केली होती. याशिवाय तिने 'सनम तेरी कसम'मधील तिचा सहकलाकार हर्षवर्धन राणेवर टीका केली. अखेर या सर्व परिस्थितीत पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनला 'सनम तेरी कसम २'मध्ये कास्ट करण्याचा अंतिम निर्णय मेकर्सने घेतला आहे.

Web Title: actress shraddha kapoor replace Pakistani actress mawra hocane in Sanam Teri Kasam 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.