अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली होती 10 कोटींची जाहिरात, कारण वाचून व्हाल हैराण!

By गीतांजली | Updated: September 21, 2020 20:26 IST2020-09-21T20:20:09+5:302020-09-21T20:26:12+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या कुटुंबियांसह क्वॉलिटी टाईम मस्त एन्जॉय करताना दिसते

Actress shilpa shetty had rejected an advertisement of Rs 10 crore | अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली होती 10 कोटींची जाहिरात, कारण वाचून व्हाल हैराण!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नाकारली होती 10 कोटींची जाहिरात, कारण वाचून व्हाल हैराण!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या तिच्या कुटुंबियांसह क्वॉलिटी टाईम मस्त एन्जॉय करताना दिसते. शिल्पा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. मुलगा, पतीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओंना पसंती देखील चांगली मिळते. शिल्पाने बॉलिवूड अभिनयासोबत आपल्या डान्ससाठी देखील ओळखली जाते. अनेक डान्स रिअलिटी शोमध्ये तिने जजची भूमिका देखील साकारली आहे. 


शिल्पाची बॉलिवूडमधली टॉप मोस्ट फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळख आहे. दोन मुलांची आई असलेली शिल्पा शेट्टी नियमित योगभ्यास करताना दिसते. आपल्या चाहत्यांसोबत ती फिटनेस आणि डाएटच्या टिप्स शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी शिल्पाने तिचे फिटनेस अॅप लाँच केले आहे. रिपोर्टनुसार त्यावेळी शिल्पाला स्लिमिंग पिलच्या (बारीक होण्याच्या गोळ्या) जाहिरातीची ऑफर आली होती मात्र शिल्पाने ती नाकारली. या जाहिरातीसाठी शिल्पाला तब्बल 10 कोटी रुपये मिळणार होते.


रिपोर्टनुसार शिल्पाचे म्हणणे आहे की, तिला ज्या गोष्टींवर विश्वास नाही, ती गोष्ट शिल्पा करणार नाही. या गोळ्या तुम्हाला कोणतेही डाएट न करता वजन कमी करण्याचे आश्वासन देतात. जे आपल्या शरीरासाठी हानिकार असू शकते, असे तिचे म्हणणे होते.

Web Title: Actress shilpa shetty had rejected an advertisement of Rs 10 crore