क्रिकेटर शुभमन गिल अन् शहनाज गिल यांचे आहेत कौटुंबिक संबंध? 'त्या' चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:08 IST2025-11-12T12:05:06+5:302025-11-12T12:08:49+5:30
क्रिकेटर शुभमन गिल अन् शहनाज गिलचं आहे कौटुंबिक कनेक्शन! 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

क्रिकेटर शुभमन गिल अन् शहनाज गिल यांचे आहेत कौटुंबिक संबंध? 'त्या' चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
Shehnaaz Gill: टीव्ही इंडस्ट्रीपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करत बॉलिवूडमध्ये सुद्धा आपलं अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या मोजक्याच अभिनेत्री आहेत, त्यातील एक नाव म्हणजे शहनाज गिल. सध्या ही अभिनेत्री एक कुडी या पंजाबी चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. मात्र,शहनाज कायम तिच्या चित्रपटांपेक्षा आडनावामुळे चर्चेत असते. शहनाज गिल आणि भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल यांच्यात एक साम्य आहे, ते म्हणजे दोघांचं आडनाव.त्यामुळे यांच्यात काही फॅमिली कनेक्शन आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. या चर्चांवर अखेर शहनाजने प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच शहनाज गिलने इक कुडी चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर अलाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं की तू आणि शुभमन गिल दोघं नातेवाईक आहात का? या प्रश्नाचं उत्तर देताना सुरुवातीला शहनाज खळखळून हसली. त्यानंतर ती म्हणाली,"मला हा प्रश्न खूपच आवडला. पण शुभमन मुळात तिथलाच आहे. कदातिच तो माझा दुरचा भाऊ किंवा चुलत भाऊ असेल. तो आमच्या अमृतसर मधलाच आहे. तो जेव्हा सोशल मीडियावर ट्रेंड होतो तेव्हा मी सुद्धा मध्ये मध्ये ट्रेंड होत असते. आमच्यात कदाचित भाऊ-बहिणीचं नातं असावं."
पुढे शहनाजला विचारण्यात आलं की,'तू कधी तुझ्या नातेवाईंकडे याबद्दल चौकशी केली आहे का?'तेव्हा अभिनेत्री म्हणाली," मी याबद्दल कधीच कोणाला विचारलं नाही. मी कायम स्वत लाच प्रश्न विचारला आहे, पण तेव्हा एकच उत्तर मिळालं की आमच्यात भाऊ-बहिणीचं नातं असेल. याचदरम्यान, शुभमनचं कौतुक करत शहनाज म्हणते- शुभमन खूप प्रेमळ आहे. तो खूप चांगला क्रिकेटपटू आहे. परंतु, मला विराट कोहली सुद्धा खूप आवडतो. त्याच्यामुळे मी क्रिकेट बघायला सुरुवात केली." असंही अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं.